*मोहूर्ली गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*
अतुल कोल्हे भद्रावती :
ताडोबा वन स्टेप सोल्युशन या संस्थेतर्फे दि. 29 मे ला सकाळी ६ वाजता स्वच्छ ताडोबा; सुंदर ताडोबा हे अभियान राबविले. या अभियानात मोहूर्ली गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अभियाना अंतर्गत मोहूर्ली प्रवेश द्वार व जंगल परिसरात प्लास्टिकच्या व टाकावू वस्तू उचलून स्वच्छता राबविण्यात आली.
यावेळी बिर्डमन सुमेध वाघमारे यांचा सुद्धा मोलाचा सहभाग होता. सरपंच सुनिता काटकर, झीरो वेस्ट ताडोबाच्या दीपा नन्नावरे, सुषमा ढोक, संध्या जेंघाटे, साक्षी जेंघाटे, जनाबाई दडमल,शामल नन्नावरे, निखिल चुनारकर, शुभम भोयर,पलाश शेंडे, आकाश खटी, रुपेश पारशिवे, आयुष मसदकर, योगेश श्रीरामे, प्रांजल चन्द्रगड़े, तेजस रामटेके, अनुभव रामटेके lआदी सहभागी होते.
Comments
Post a Comment