भावी राष्ट्र घडविणारा संस्कार महायज्ञ भद्रावती येथे संपन्न**भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर संपन्न*

*भावी राष्ट्र घडविणारा संस्कार महायज्ञ भद्रावती येथे संपन्न*

*भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर संपन्न*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                भारतीय संस्कृतीतील महानतम जीवन मुल्ये आजच्या पिढीमध्ये रुजवून बाल तरुणांची मने सुसंस्कार युक्त घडावीत व धर्म, समाज तसेच राष्ट्र कार्यात त्यांचे योगदानाचे महत्त्व लक्षात घेता भद्रावती येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावतीचे वतीने भक्त निवास गणेश मंदिर, सुर्यमुखी हनुमान मंदीर,गवराळा येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर नुकतेच पार पडले. १५० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देऊन वंदनीय राष्ट्रसंताचा विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
१० दिवस चाललेल्या अनिवासी शिबिराची सुरुवात दररोज पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यानाने होऊन त्यानंतर सूर्यदर्शन ,योगासने, मल्लखांब, कराटे, लाठी-काठी,बौद्धिक तासीका, संगीत वर्ग, गटचर्चा भजन-श्लोक, श्रीमद्भगवद्गीता संथा, टाळ-पदन्यास, ओळख सुंदर जीवनाची व सामुदायिक प्रार्थनेने शेवट होऊन पुढील दिनचर्येकरीता विद्यार्थ्यांना स्वगृही पाठविल्या जात असे. वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलेले ग्रामगीतोक्त जीवन शिक्षणाचे धडे देणा-या या शिबीरात सामुदायिक ध्यान व प्रार्थनाप्रसंगी संपूर्ण विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उपस्थिती तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांची भेट या शिबिराचं विशेष आकर्षण ठरले. 
१० दिवस चाललेल्या सुसंस्कार शिबिराच्या  समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्प गिताने होऊन अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात दिलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी  सादर केले. 
श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडी, मोझरीचे संचालक तसेच मार्गदर्शक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांचे मार्गदर्शनात संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुर्लीधरजी गोहने होते . प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन सरपटवार सर, डाॅ. मयुरा अवताडे, हभप केशवानंद मेश्राम महाराज, शालिकजी दानव सर उपस्थित होते. शिबीर प्रमुख हभप मनोज महाराज चौबे यांनी उपस्थित पालकवर्ग  व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  समारोपीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिबीर प्रमुख गुणवंत कुत्तरमारे तर आभार गजानन डंभारे यांनी मानले.
श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती तर्फे चालविल्या जाणाऱ्या स्थायी निधी उपक्रमात यावर्षी मदत करणारे सहयोगदाते मधुकरराव बांदुरकर, नितीन खैरकर, प्रशांत कारेकर, शेखर घुमे यांचा मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला तर सौ. उज्वला उल्हासराव भास्करवार व श्रीमती निताताई गुंडावार यांनी या प्रसंगी स्थायी निधी उपक्रमाकरीता संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विशाल गावंडे, विवेक महाकाळकर, प्रशांत मत्ते, झनक चौधरी,मुरलीधर मेश्राम, गोपीचंद मेश्राम, तुकाराम उमाटे, विनोद रासेेकर, नरेश दिवसे, रविश मुरकुटे, खुशाल कंचनवार, ऋषीकेश मेश्राम, रमेश धाबेकर, कालिदास चेडे, क्षितीज शिवरकर, अनंता जांभुळकर, राहुल पवार, रितेश पराते,आकाश तराळे , ओमप्रकाश पांडे, गजानन ढेंगळे, रवि पचारे, प्रकाश पिंपळकर, शोभाताई खडसे, जिजाबाई देठे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी असंख्य पालकवर्ग व नागरिक उपस्थित होते.

Comments