घरपोडी करणारे घर मालकाची मुलगी व जावईच निघाला चोर**१५ तोडे सोन्यासह रोख रक्कम केली होती लंपास**मुलीला अटक, जावई फरार : भद्रावती शहरातील घटना*
*१५ तोडे सोन्यासह रोख रक्कम केली होती लंपास*
*मुलीला अटक, जावई फरार : भद्रावती शहरातील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती -
शहरातील गोविंद लेआउट येथे राहणाऱ्या घरातून १५ तोळे सोनं व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना दिनांक 4 मेला घडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या तपासात घरमालकाची मुलगी व जावईच या घरपोडीचे चोर निघाल्याने आज गुरुवार ला मुलीला अटक करण्यात आली असून जावई फरार आहे.
वैशाली सतीश कारेकर वय २८ वर्ष, सतीश कारेकर वय ३८ वर्ष राहणार वणी हल्ली मुक्काम भद्रावती असे आरोपीचे नाव आहे फिर्यादी महेश माशीरकर हे मंदा वरखडे राहणार गोविंद लेआउट यांच्या घरी भाडयाने राहतात घटनेच्या दिवशी महेश यांचे आई-वडील बाहेर गावी गेले होते व महेश हा काही कामानिमित्त घरातील दरवाज्याला ताला न लावता निघून गेला ही संधी वरील आरोपीने पाहली व त्याच्या घरात प्रवेश प्रवेश करून कपाटातून १५ तोळे सोनं व रोख रक्कम ७ हजार लंपास केले महेश हा घरी आल्यावर त्याला घरात चोरी झाल्याचे कळले त्याने दिनांक पाच मे ला भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार बिपिन इंगळे यांनी तपास केला असता घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र घटनेच्या वेळी बाहेरील कोणी व्यक्ती घरात प्रवेश करताना किंवा जाताना दिसला नाही त्यानंतर पोलिसांना पुर्णता संशय घरमालकाकडे वळला वैशालीला पोलिसी हिसका दाखवताच तिने या चोरीची कबुली दिली वैशालीला अटक करण्यात आली असून तिचे कडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील दुसरा आरोपी सतीश हा फरार आहे ही कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विरेंद्र केदार, गजानन तुपकर, अनुप आष्टूनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी, जगदीश झाडे, योगेश घोटोडे यांनी केली.
Comments
Post a Comment