अतुल कोल्हे भद्रावती :-
लक्ष फाउंडेशन भद्रावती तर्फे पिपराडे ग्राउंड भद्रावती (भद्रावती ग्रेनेड्स क्रिकेट क्लब भद्रावती) तर्फे मुला मुलींचे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर एक मे ते 15 मे च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या प्रसंगी लक्ष फाउंडेशन चे संदीप शिंदे, नकुल शिंदे, सचिन सरपटवार, अफजल भाई,सुनील महाले, रोहन कुटेमाटे, चंद्रकांत खारकर, अविनाश पारोदे, प्रशिक्षक समीर बल्की, प्रदीप खंगार, सुहास वाढई ,विनायक माडोट कुंदन चौधरी, निखिल कुत्तरमारे,सुयोग बल्की हे उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन अफजल भाई यांच्या हस्ते पार पडले.30 प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला असून मुला मुलींचा यात सहभाग आहे.