वरोरा हद्दीतील करंजी नदी घाटातुन चोरीची रेती वाहतुक करणा-या चार ट्रॅक्टर सहीत 24,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची धडक कारवाई

वरोरा हद्दीतील करंजी नदी घाटातुन चोरीची रेती वाहतुक करणा-या चार ट्रॅक्टर सहीत 24,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची धडक कारवाई

वरोरा 
प्रतिनिधी 

वरोरा: पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांच्या पथकाने पो.स्टे. वरोरा येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 13.05.2024 रोजी गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या करंजी येथील वर्धा नदी घाटातुन ट्रॅक्टरनी रेतीची वाहतुक करुन वरोरा शहरात विक्री करणार आहेत अश्या खबरेवरुन ने सकाळी 07.00 वा. दरम्यान करंजी नदी घाट ते करंजी गावाकडे येणा-या रोडवर नाकाबंदी करीत असता चार वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली थांबवुन चारही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता चारही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे चार ब्रास रेती मिळून आली. 
वर नमुद ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती करंजी वर्धा नदीघाट येथुन चोरुन आणुन वरोरा शहरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरच्या कारवाईत एकुण 04 ब्रास रेती किं. 20,000/- रु. व 04 ट्रॅक्टर कि, 24,00,000/- असा एकुण 24,20,000/-रु. (चोवीस लाख विस हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) अनिल अशोक शेंदरे वय 30 वर्षे रा. एकार्जुना ता. वरोरा 2) प्रविण शेषराव उरकुडे वय 33 वर्षे रा. करंजी ता. वरोरा 3) आशिष यशवंत थेरे वय 28 वर्षे रा. एकार्जुना ता. वरोरा 4) तुषार भास्कर माथनकर वय 22 वर्षे रा. करंजी ता. वरोरा व मालक नामे 5) अमोल गजानन पारोधे वय 40 वर्षे रा. एकार्जुना ता. वरोरा 6) सुजित देविदास कष्ठी वय 50 वर्षे रा. करंजी ता. वरोरा 7) जाकीर रसुल शेख वय 40 वर्ष रा. चिरघर प्लॉट, वरोरा 8) निलेश अण्णाजी मिलमिले वय 28 वर्षे रा. करंजी ता. वरोरा यांचेविरुध्द पो.स्टे. वरोरा येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले. उपरोक्त कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश
अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी यशस्वीरीत्या कारवाई केली.

Comments