*वरोड्यात 20 मेला श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखीचे आगमन*

*वरोड्यात 20 मेला श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखीचे  आगमन* 

वरोडा : श्याम ठेंगडी वरोरा 

 अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळातर्फे स्वामी पादुका पालखी महाराष्ट्रात परिक्रमा करीत असून त्या पालखीचे वरोड्यात २० मे रोज सोमवारला आगमन होत आहे.
        शहरात  पालखीचे नागपूर नाका येथे आगमन होताच तेथून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीने फिरत श्री स्वामी समर्थ यांची यांच्या पादुकांची पालखी कस्तुरबा वॉर्ड येथील राकेश भागडे यांचे निवासस्थानी पोहचेल. पालखी निमंत्रक राकेश भागडे व रोहिणी भागडे यांचे हस्ते पूजन व महाआरती होणार आहे.महाराजांच्या पादुका त्यांचे निवासस्थानी सायंकाळी ७ नंतर राहणार असून दुसरे दिवशी सकाळी ७वाजता पादुका पूजन व महाराजांना अभिषेक झाल्यानंतर  पुढील प्रवासासाठी स्वामी समर्थ महाराज यांचा पादुका परिक्रमा सोहळा होणार असून या कार्यक्रमाला व दर्शनाला भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक व भागडे परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

Comments