*दोन आरोपी अटकेत : भद्रावती पोलिसांची कारवाई*
अतुल कोल्हे भद्रावती -
तालुक्यातील मांगली नाल्यातून अवैध रित्या रेती जेसीबी द्वारे हायवा मध्ये भरत असताना भद्रावती पोलिसांनी शुक्रवारला धाड टाकली यात दोन आरोपीसह हायवा व जेसीबी जप्त करण्यात आली यातील आदम सुभान शेख, परशुराम किशन मातनकर राहणार भंगाराम वार्ड असे आरोपींचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे असल्याने महसूल व पोलीस विभाग कामात व्यस्त आहे त्याचाच फायदा घेऊन तालुक्यातील मांगली येथील नाल्यातून एम एच ३४ ए बी ६७७६ या आयवा मध्ये जेसीबी द्वारे रेती भरण्याचे काम चालू असल्या बाबतची गुप्त माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांना मिळाली त्या आधारे पोलिस हवालदार रामप्रसाद नैताम, अनिल पेंदोर यांनी नाल्यावर धाड टाकली यात वाहना सह तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment