एटीएम मशीन आणि मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यांना अटक. परप्रांतीय चोरट्यांची टोळी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात.

एटीएम मशीन आणि मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यांना अटक. 

परप्रांतीय चोरट्यांची टोळी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात.
 
चंद्रपूर 
चेतन लुतडे 

दि. ३१/०३/२०२४ रोजी फिर्यादी  अतुल कावळे पोलीस स्टेशन, रामनगर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, दिनांक २८/०३/२०२४ रोजी नाईट डयुटी ऑफिसर म्हणुन ड्युटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली होती .
बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए. टि.एम. मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये पोलिसांनी जावुन पाहीले असता, ए.टि.एम. मधुन जोर-जोराने सायरनचा आवाज येत असल्याचे तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही. कॅमे-यावर प्रे मारून कॅमे-याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपनी अज्ञात वाहनाने फळ काढला होता. 

 फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. अप.क. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. 

नमुद गुन्हयाच्या तपासा दररम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक येथील अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी रवाना झाले. गुन्हे शोध पथकानी तात्काळ घटनास्थळाचे आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले असता, एका काळया रंगाच्या थार मध्ये काही अज्ञात इसम ए. टि.एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. 
तेव्हा पोलीस अधिक्षक , अपर पोलीस अधिक्षक , तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पथकास रवाना केले. 
त्यावरून पोउपनि सामलवार यांचे पथक सी.सी. टि. व्हि. फुटेज पाहत काळया रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैद्राबाद येथे जावुन थार गाडी व आरोपीतांचा शोध घेत आरोपी नामे हुसेन अली वय-२१ वर्ष, रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विचारपुस केले असता, त्यांने 
१) मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद, 
२) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, 
३) राशीद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, 
४) सल्ली उर्फ सलमान रा. भोड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडन्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद याचा हैद्राबाद येथे शोध घेतला असता मिळाला  नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे.
दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांचा शोध घेतला असता, नमुद आरोपी फरारीत आहे.  गुन्हयातील आरोपी नामे तस्सी उर्फ तस्लीम उदय खान, वय-२६ वर्ष, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरुग्राम येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

नमुद गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस कस्टडी रिमांड घेवुन गुन्हयात वापरलेली काळया रंगाची थार गाडी हैद्राबाद येथुन किरायाने घेवुन वेगवेगळ्या नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे सांगितले त्यावरून नमुद वाहन आरोपीकडून एक काळया रंगाची थार गाडी क्रमांक टि. एस. ३१ जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापुर्वी जिल्हा चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असुन अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहे.

.

गुन्हे शोध पथक येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेण्यासाठी अतिशय परिश्रम व तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवुन अटक करण्यात यश आल्याने चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो. नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ सिडाम, पोहवा /२२९६ रजनिकांत, पोहवा/११७६ किशोर, पोहवा/२२७३ शरद, पोहवा/५३२ सतिश, पोहवा /११६५ आनंद, पोहवा /२४५४ प्रशांत, नापोशि/२४३० लालु, पोशि/८२५ हिरालाल, पोशि/८४७ रविकुमार, पोशि/८८७ प्रफुल, पोशि/८८१ संदिप, पोशि/२५१३ विकास, पोशि/६९९ विकास जाधव, पोशि/१२३० पंकज, मपोहवा/४६२ मोरे पोलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टे, चंद्रपुर येथील नापोशि/छगन, पोशि/वैभव, पोशि/भास्कर, पोशि/राहुल, पोशि/उमेश सहकार्याने कार्यवाही केले.

Comments