युवासेना महाराष्ट्र सचिव राजे जयसिंग भोसले यांचे मार्गदर्शनात शिवालय येथे युवासेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न**चंद्रपूर जिल्हा विस्तारक सुर्याभाऊ हिरेखन आणि संदिप भाऊ पटेल यांची प्रमुख उपस्थिती.*

*युवासेना महाराष्ट्र सचिव राजे जयसिंग भोसले यांचे मार्गदर्शनात शिवालय येथे युवासेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न*
*चंद्रपूर जिल्हा विस्तारक सुर्याभाऊ हिरेखन आणि संदिप भाऊ पटेल यांची प्रमुख उपस्थिती.*

भद्रावती:- प्रतिनिधी

आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेना प्रमुख आदरणिय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, *शिवालय* येथे 75-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. 
सदर बैठकिमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना युवासेना महाराष्ट्र सचिव राजे जयसिंग भोसले यांनी सांगितले की, युवासेना हि पक्षाचा आधार असुन युवकांनी संपुर्ण शक्तीनिशी आणि जोमाने कार्य करुन युवासेनेची ताकद दाखवली पाहिजे, तसेच 75-वरोरा विधानसभा क्षेत्रातील युवकांना कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत पोहचवाव्या त्या सोडविण्याचे नक्कीच प्रयत्न करणार तसेच विधानसभा क्षेत्रात युवासेनेची ताकद वाढवुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून ८०% समाजकारण व २०% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यात विशेषत: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध समाजपयोगी उपक्रम सुरू असुन स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देतांना रविंद्र शिंदे म्हणले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष बळकट करण्याकरीता विधानसभा क्षेत्रात विविध कामे करण्यात येत असुन सगळ्या विंगचे पदाधिकारी पक्ष संघटनेचे काम करीत आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा विस्तारक सुर्याभाऊ हिरेखन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विधानसभा क्षेत्रात कोणत्याही पदाधिकाऱ्यांना आरोग्यविषयक समस्या असल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच सध्या देशात सुरू असलेल्या व भविण्यात येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जातांना युवासेनेचे कार्य कशा प्रकारे असावे याचे नियोजनासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला युवासेना महाराष्ट्र सचिव राजे जयसिंग भोसले, चंद्रपूर जिल्हा विस्तारक सुर्याभाऊ हिरेखन आणि संदिप भाऊ पटेल युवासेना जिल्हा प्रमुख रोहन कुटेमाटे, विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख शरद पुरी, विधानसभा युवाधिकारी अभिजीत कुडे, युवासेना वरोरा तालुका प्रमुख विक्की तवाडे, युवासेना भद्रावती तालुका प्रमुख राहुल मालेकर, युवासेना वरोरा शहर प्रमुख प्रज्ज्वल जानवे, युवासेना भद्रावती शहर प्रमुख मनोज पापडे, उपशहर प्रमुख अनिल सिंग, शशिकांत राम, अभिजीत अष्टकार, प्रशांत कारेकार, वरोरा शहर चिटणीस फैजल शेख, विधानसभा प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते, उपतालुका प्रमुख रामानंद वसाके, अनिरुद्ध वरखडे, तेजस कुंभारे, आदर्श आसुटकर तथा युवासेनेचे इतर पदाधिकारी तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments