अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अँड.गजानन बोढाले तर उपाध्यक्षपदी अँड.मधुकर फूलझेले यांची नियुक्ती

अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अँड.गजानन बोढाले तर  उपाध्यक्षपदी अँड.मधुकर फूलझेले यांची नियुक्ती

वरोरा३/४/२०२४
चेतन लुतडे 
वरोरा अधिवक्ता संघाच्या वतीने दि. २/४/२०२४ रोजी वरोरा अधिवक्ता सघांची निवडणुक पार पाडली. त्यात अध्यक्ष म्हणुन अँड. गजानन बोढाले यांची निवड झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अँड. मिलींद देशपांडे यांचा पराभव झाला. यात अँड. गजानन बोढाले यांना ४० मते तर अँड. मिलींद देशपांडे यांना ३४ मते मिळाली. त्यामुळे अँड.. गजानन बोढाले अध्यक्ष पदासाठी विजय झाले. 

तसेच उपाध्यक्ष पदासाठी एकुण तीन उमेदवार होते यात अँड. दिनेश डावरी, अँड. मधुकर फुलझेले, अँड. साळवे पैकी अँड मधुकर फुलझेले बहुमताने उपाध्यक्ष पदासाठी विजय झाले. तसेच सचिव पदासाठी एकुण चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात अँड. संदिप डाखरे, अँड आदेश अलोणे, अँड रोशन नकवे, अँड भावना लोया सचिव पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात अँड. संदिप डाखरे यांना २२ मते, अँड. रोशन नकवे यांना १७ मते, अँड. भावना लोया यांना ५ मते व विजय उमेदवार अँड. आदेश अलोणे यांना ३१ मते मिळाल्यामुळे त्यांना बहुमताने सचिव पदासाठी अधिवक्ता संघाच्या मतदारांनी निवडुण दिले. तसेच कोषाध्यक्ष म्हणुन अँड. दिपीका ठावरी यांची अविरोध निवड झाली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अँड. नितीन पाटील व अँड. आशिष जांभुळे यांनी कामगिरी पार पाडली.

वरोरा अधिवक्ता संघाची निवडणुक तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. अधिवक्ता संघाची पदाधिकाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments