भद्रावतीत १० मे रोजी श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळा

*भद्रावतीत १० मे रोजी श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळा* 

 *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार* 
 *विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांचा सहभाग* भद्रावती = अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर दि. १० मे रोज शुक्रवार रोजी सायंकाळी ४ वा.स्थानिक श्री मंगल कार्यालयात   स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने तसेच विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या सक्रिय  सहभागातून  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व  सत्संग सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
  याप्रसंगी  स्थानिक श्रीमंगल कार्यालयात दि. १० मे रोज शुक्रवारला  सायं ४ वा.  सत्संग सोहळ्यात  शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि भांदेवाडाचे जगन्नाथ महाराज यांचे पादुका पुजन आणि दर्शनाचा  लाभ उपस्थितांना घेता येईल. याप्रसंगी परमपुज्य भागवतमनीषी संत श्री मनीष भाईजी महाराज आपल्या  सुमधुर वाणीतुन सत्संगपर मार्गदर्शन करतील. याप्रसंगी अतिथी चंद्रपूरचे  अँड. पुरुषोत्तम सातपुते, विशेष अतिथी भांदेवाडा येथील विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष बबनराव धानोरकर आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा सोहळ्याचे आयोजक प्रा. धनराज आस्वले प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सोहळ्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
यानिमित्याने दि. १० मे रोज शुक्रवारला  दु. २.३० वा. पादुका पालखी भद्रावती नगर परिक्रमा  भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. नगर परिक्रमा शोभायात्रा श्री रविंद्र शिंदे यांच्या निवास स्थानापासून सुरू होईल. या शोभायात्रेचा मार्ग  विठ्ठल मंदिर - गांधी चौक -जामा मस्जीद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - संत झिंगुजी महाराज मठ - श्रीमंगल कार्यालय असा राहतील.
   या उपक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा / भद्रावती, श्री संत सदगुरू जगन्नाथ महाराज मठ वरोरा / भद्रावती, श्री जगन्नाथ महाराज मठ भांदेवाडा, संत झिंगुजी महाराज देवस्थान समिती भद्रावती, सहजयोग ध्यान साधना केंद्र वरोरा / भद्रावती, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ वरोरा / भद्रावती, श्री राम जन्मोत्सव समिती भद्रावती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती भद्रावती, श्री गुरुजी फाऊंडेशन भद्रावती, संत निरंकारी सत्संग मंडळ वरोरा / भद्रावती, श्रीमित्र गणेश मंडळ वरोरा, सर्वधर्म समभाव तसेच धार्मिक व सामाजिक संस्था वरोरा / भद्रावती यांचा सहभाग आहे. या सोहळ्यात जनतेने फार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments