*निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करा**वरोडा येथे उत्तरवार मित्रपरिवारांची मागणी !* *वरोडा पोलीसांना दिले मागणीचे निवेदन*

*निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करा*

*वरोडा येथे उत्तरवार मित्रपरिवारांची मागणी !* 

*वरोडा पोलीसांना दिले मागणीचे निवेदन*

वरोडा: शाम ठेंगडी 

           वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
      देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या विरोधात आर्वाच्य भाषेत शिवीगाळ व अपशब्द वापरणाऱ्या निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वरोडा येथील किशोर उत्तरवार व मित्र परिवारांनी आज 25 एप्रिल रोज गुरुवारचा वरोडा येथील पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
         सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना या रणधुमाळीत व्हाट्सअप,युट्युब व विविध माध्यमांवर निलेश कराळे यांच्या भाषणाची एक क्लिप प्रसारित होत आहे. ज्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शहा यांचे विषयी अभद्र व अत्यंत खालच्या पातळीत शिवीगाळ करून वक्तव्य केलेले आहे. मोदी हे लोकशाही पद्धतीने देशाचे निर्वाचित पंतप्रधान असून हे पद कोणत्याही पक्षाचे नव्हे तर देशाचे संवैधानिक पद आहे. ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. म्हणून त्यांचा अपमान करणे म्हणजे त्या सर्वोच्च पदाचा  पर्यायाने देशाचा अपमान करणे आहे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना सार्वजनिक रित्या शिवीगाळ करणे,त्यांच्याविषयी अभद्र वक्तव्य करणे हे समाजात तेढ निर्माण करून असंतोष निर्माण करणारे आहे. म्हणून आम्ही भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून निलेश कराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व समाजात तेढ व द्वेष भावना निर्माण करून असंतोष फैलावणे अशा विविध कलमांतर्गत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोर उत्तरवार व मित्रपरिवाराने आज सायंकाळी वरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Comments