पानवडाळा येथे २६ एप्रिलला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन**माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती*

*पानवडाळा येथे २६ एप्रिलला  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन*

*माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती*

 अतुल कोल्हे भद्रावती :
                  तालुक्यातील पानवडाळा येथे शुक्रवार दि. २६ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता अरविंडो रियालिटी इफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कोळसा खान प्रल्पसंदर्भात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणावर हंसराजभैय्या अहिर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तथा माजी मंत्री भारत सरकार ,यांच्या मार्गदर्शनाखाली तथा नेतृत्वात टाकळी, जेना, बेलोरा उत्तर व दक्षिण कोळसा खदानी मार्फत होणाऱ्या भुसंपादन आणि पुनर्वसन आणि रोजगार बद्दल समस्या जाणून घेण्याकरिता तसेच सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी  संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आहे.
    या मेळाव्यात धनंजय पिंपळशेंडे वरोरा, नरेंद्र जिवतोडे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रकल्प ग्रस्तांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता निराकरण करण्यासाठी तयारी करावयाची आहे. यामध्ये                           प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे संपादन योग्य कालावधी मध्ये करण्यात यावे,                         जमिनिचा योग्य मोबदला मिळण्याबाबत,                             बेलोरा गावाचे पुनर्वसन योग्य कालावधी मध्ये योग्य ठिकाणी करण्याबाबत,स्थानिक प्रकल्पग्रस्त व युवकांना योग्य मोबदला देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांचा समावेश असणार आहे . या संवाद मेळाव्यात मौजा पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी,किलोनी,कान्सा सिरपुर येथील  प्रकल्प ग्रस्त शेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी केले आहे.

Comments