आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची भद्रावती पोलीस ठाण्यात काँग्रेसची तक्रार

आक्षेपार्ह  विधान केल्याबद्दल भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची भद्रावती पोलीस ठाण्यात काँग्रेसची तक्रार

 अतुल कोल्हे भद्रावती :-


 चंद्रपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भावा-बहिणींच्या पवित्र नात्याबद्दल अश्लील व आक्षेपार्ह  विधान केले त्याबद्दल भद्रावती तालुका व शहर काँग्रेस तर्फे भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार करून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भद्रावती काँग्रेस तर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध करण्यात आला.चंद्रपूर येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षातील भावा-बहिणींच्या पवित्र नात्यांबद्दल अश्लील व आक्षेपार्ह  विधान केले. स्वतःला सुसंस्कृत व उच्चशिक्षित समजणारे सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान करून तमाम महिलांचा अपमान केला असल्याचे काँग्रेसने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलांविषयी अशी वाईट कल्पना असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या या तक्रारीतून करण्यात आली आहे.तक्रार करताना काँग्रेसचे संध्या रोडे,सरिता सूर, शितल गेडाम, सुरज गावंडे,उमेश रामटेके, प्रमोद नागोसे,प्रशांत झाडे आदी उपस्थित होते.