ही निवडणूक शेतकऱ्यांच्या सन्मानाची, संविधान वाचवण्यासाठी, महिलांच्या हक्कासाठी ही लोकसभेची निवडणूक प्रत्येक व्यक्तीला मी खासदार समजून लढण्याची गरज

काँग्रेस निवडून आल्यास शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल इंडस्ट्रीज तयार करणार.

आता रडणार नाही आता रडवणार .... प्रतिभाताई आक्रमक.

वरोरा 2/4/2024
चेतन लुतडे

2024 लोकसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. चंद्रपूर वरोरा आर्णी क्षेत्रासाठी भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेस पक्षाचे प्रतिभाताई धानोरकर असे दोन्ही तुल्यबळ उमेदवार 2024च्या लोकसभा निवडणुकीत समोरासमोर उभे आहे. याव्यतिरिक्त अनेक उमेदवार उभे आहेत. परंतु या क्षेत्रात सरळ लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच होत असताना दिसत आहे. 

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी नाकारली होती मात्र पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आदेशाचे पालन ते करीत आहे. तर
आ.धानोरकर यांना मागील प्रमाणे संघर्ष करून तिकीट मिळवावी लागली. या संघर्षाचा फायदा धानोरकर यांना मिळाला असून लोकसभेमध्ये परत येताच अलोट जनसागर पाहता धानोरकर यांना पती स्व.बाळू धानोरकर याची आठवण येताच अश्रू अनावर झाले होते.
या अश्रूचे भांडवल आ.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील आपल्या भाषणेतून केले.  आणि यातूनच लोकसभेचे खरे विगूल  वाजले. आणि रणसंग्राम सुरू झाला आहे ‌.

नामांकन अर्ज भरत असताना दोन्ही पक्षाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान दोन्ही पक्षातर्फे भावनात्मक खेळ खेळण्यात आला. यामध्ये धानोरकर यांचाच फायदा होताना दिसला. 

 लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये धानोरकर यांच्या बाजूने भावनात्मक जनता जास्त प्रमाणात जुळत गेली आहे. जातीचे प्राबल्य जरी मोठे असले तरी सहानुभूती ही महिलाच्या बाजूने जात असताना दिसत आहे याचाच परिणाम लोकसभेवर नक्की पडेल असे जाणकारांचे मत आहे.