*लहान मुलांनी लावले रवींद्र शिंदे यांना भजनाचे वेड* संत गजानन महाराज माऊली भजन मंडळाला साहित्याची मदत.


लहान मुलांनी लावले रवींद्र शिंदे यांना भजनाचे वेड

*संत गजानन महाराज माऊली भजन मंडळाला साहित्याची मदत.*

वरोरा ३मार्च२०२४
चेतन लुतडे


संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव समिती, बोपापुर (खांबाडा) च्या वतीने आज दि.03 मार्चला संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधत प्रगट दिन सोहळा व हरिकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
सदर कार्यक्रमाकरीता  रविद्र शिदे ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख   तथा सहकारी वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी बोपापूर येथील कार्यक्रमाला भेट दिली. यादरम्यान गावातील दिंडी सोहळ्यामध्ये बोपापुर येथील 8-10 वयोगटातील लहान मुलांचे भजन मंडळ भक्तगणांची लक्ष वेधत होते. त्यावेळी शिंदे यांनी त्यांची विचारपुस केली असता सदर मुले हि विविध गावातील दिंडी सोहळ्यामध्ये भाग घेऊन त्यांच्या  सुमधुर भजनाने भाविकांचे मन प्रसन्न करतात. अशी कित्येक भजने ते परिसरातील गावांमध्ये गात असतात. परंतु या मुलांकडे भजन करण्याकरिता काही साहित्य नसल्याचे कळताच शिंदे यांनी लगेच दखल घेत भजनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे या लहान मुलांमध्ये आनंदोत्सव निर्माण झाला असून गावातील भक्तांनी रवींद्र शिंदे यांना प्रगट दिनानिमित्त भरभरून आशीर्वाद दिले.
 
त्याच उपक्रमातुन  बालगोपाळ भजंन मडंळीच्या कलागुणांना वाव  मिळाला असून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच त्यांचा उत्साह व्दिगुणीत होवुन त्यांच्या या कार्याला चालना मिळावी या हेतुने रविंद्र शिंदे यांनी त्यांना भजनाकरीता सहित्य घेण्याकरीता आर्थिक मदत केलीच तसेच तिथे उपस्थितीताना  सुध्दा लोकवर्गणीतुन या सदकार्यास  मदत करावी असे आव्हान केले.तसेच बालगोपाळाचे ज्या ठिकाणी भजन मंडळ असतील त्यांना सर्वांना मदत केले जाईल असे जाहीर आव्हान केले. बालगोपालांच्या संत गजानन महाराज माऊली भजंन मंडळांचे  चि.पुरूषोत्तम तेजणे, चि.ओम धोटे, चि. नैतिक धोटे, चि.सार्थक तेजणे चि.कार्तिक ठाकरे, चि.कार्तिक नेहारे, चि.मंथन धोटे, चि. यश उईके, चि.संदिप ऊईके, चि.हिमांशु उईके, चि.शंतनु धोटे, चि.मयुर मेश्राम, प्चि.रियांशु धोटे  यांचा भजन मंडळी समावेश आहे. शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी लहान भजन मंडळीची दखल घेतल्याने गावकरी आनंदी होते.
या कार्यक्रमासाठी वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, प्रशांत इंगळे, सागर धोटे, विकास गोहणे, केशव न्याहारे, गजानन तेजणे, किसन टोपलमोडे, केशव न्याहारे, नारायण गोहणे, कैलास मेश्राम, प्रयाग गोहणे, पवन धोटे, विठ्ठल गोहणे, मोहित धोटे, ईश्वर धोटे, जागो धोटे, राहुल गोहणे, वैभव लडके, आकाश धोटे, स्वप्नील नागोसे, केशव गोहणे तथा गावातील समस्त महिला, पुरूष तथा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments