एकोणा माईन्समधून चाळीस टन कोळशाची चोरी



एकोणा माईन्समधून चाळीस टन कोळशाची चोरी

 वरोरा : वेकोलि कुचना मुख्यालयांतर्गत असल्याचे येणाऱ्या वरोरा तालुक्यातील एकोणा कोल माईन्समधून ४० टन कोळसा चोरीला गेल्याची घटना घटली. यासंदर्भात सुरक्षारक्षकाने वरोरा  पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, कोळसा भरलेला हायवा बंद पडल्याने ही चोरी उघडकीस आल्याची बोलले जाते.
 ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.

एकोणा माईन्समधून कोळसा चोरीला जात असल्याची मागील अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. रविवारी १० मार्च रोजी पहाटे एमएच ४० सीडी ६९११ या क्रमांकाच्या हायवामध्ये एकोणा माईन्स परिसरात पोकलेन मशीनच्या साहाय्याने ४० टन कोळसा भरण्यात आला. या कोळशाबाबत कुठलाही परवाना नसल्याचे समजते. एकोणा माईन्सचा सुरक्षारक्षक गस्त घालत असताना हायवा व पोकलेन मशीन डम्पिंग परिसरात आढळून आले. मात्र हायवा व पोकलेनचे चालक फरार झाले. विशेष म्हणजे, हायवा नादुरुस्त झाल्याने ही चोरी उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.

येथून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी होत असल्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पोलिस तक्रारीमध्ये ४० टन कोळशाची किंमत एक लाख तीस हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकोना कोळसा खाणीतून कोळसा उचल करण्याचे कंत्राट ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळाले त्या त्यापैकी विकास कोल व चड्डा ट्रान्सपोर्ट कंपन्याचं रेकॉर्ड हे संशयास्पद आहेच, पण स्थानिक एकोना वेकोली चे सबएरिया मॅनेजर यांच्या सोबत साठगाठ करून कोळसा सायडींग वरून ह्या कंपनीतील कर्मचारी सुपरवाईजर बेकायदेशीर कोळसा ट्रक मध्ये भरून तो परस्पर बाहेर पाठवल्या जातोय व दिवसातून किमान पाच ते दहा गाड्या भरल्या जातं असल्याची चर्चा आहे, या कोळसा चोरीत राजकीय वरदस्त असणाऱ्या वरोरा व बाहेरील गुंडाच्या टोळीचा सहभाग असल्याचे बोलल्या जातं असून ते आरोपी आता फरार झाले आहे, ही कोळसा चोरी पूर्व नियोजित पद्धतीने मागील अनेक दिवसापासून सुरु असून त्याला लोकप्रतिनिधी यांचा राजाश्रय असल्याने बिनबोभाटपणे सुरु आहे, दरम्यान आता हे प्रकरण उघडकीस आल्याने खरे सूत्रधार कोण? याबद्दल पोलीस तपासातून समोर येणार आहे.

Comments