बिराडकार अशोक पवार यांची नवनिर्मित कादंबरी "गावखोरी" सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांना समर्पित*

*बिराडकार अशोक पवार यांची नवनिर्मित कादंबरी "गावखोरी" सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांना समर्पित*

*“गावखोरी” या कादंबरीतल्या नायकाचा प्रवास हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणी बहुजनवादी चळवळ यांच्यावर आधारीत*

अतुल कोल्हे भद्रावती :
                  साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रतिष्ठित व लोकप्रिय नाव म्हणजे अशोक पवार. उभ्या महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात अशोक पवार यांना कुणी ओळखत नसेल, असे शोधून सापडणार नाही. पडझड, इळनमाळ, बिराड, भुईभेद या कादंबऱ्या गरीब, शोषित, बहिष्कृत, अन्यायग्रस्त व जगण्यातील संघर्ष मांडणाऱ्या समाजाचा एक चेहरा घेवून निर्मित झाल्या. अशोक पवार यांनी स्वतः जगलेलं व पाहिलेलं आयुष्य यातून मांडलं... एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात ज्या व्यक्तींनी हात धरून प्रवाहात आणले, त्यांना ते विसरले नाही. त्यांचा हात पकडणारे, साथ देणारे असेच एक व्यक्तिमत्व रविंद्र शिंदे यांच्या निवासी त्यांना भेट देवून त्यांची नवनिर्मित कादंबरी "गावखोरी" त्यांना समर्पित केली. त्यावेळी दोघेही अत्यंत भावुक होवून गेले. आई सुषमाताई शिंदे यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले.
अशोक पवार यावेळी सांगू लागले की, “गावखोरी” या कादंबरीतल्या नायकाचा प्रवास हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणी बहुजनवादी चळवळ यांच्यावर आधारीत आहे. त्यांची “गावखोरी” ही कादंबरी लोकवाड्:मय गृह मुंबई या नामांकित प्रकाशन संस्थेनी नुकतीच प्रकाशीत केली. त्यांचा जन्म भटक्यांच्या बिराडावर झाला. अतिशय गरीबीत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले. बिराड घेवून भटकत-भटकत ते चंद्रपूरात आले. नामांकित पत्रकार गजानन जानभोर यांनी रविंद्र शिंदे यांचेसह भेट घालून दिली. रविंद्र शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी त्यांचे बिराड बसवून दिले. 
त्यांच्या जगण्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्यांनी बिराड, पडझड, ईळनमाळ, भुईभेद अशी जवळ जवळ 22 पुस्तके लिहीली. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा रुपये एक लाखाचा पुरस्कार तसेच केन्द्र सरकारचा एक लाख रुपयाचा पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरीकेचा रुपये पन्नास हजारचा पुरस्कार असे एकुण 43 साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 
त्यांची पुस्तके महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापिठात अभ्यासक्रमाला आहेत. महाराष्ट्रातल्या वेग-वेगळया विद्यापिठातुन 22 विद्यार्थी त्यांच्या कादंबरीवर एम.फिल., पी.एच.डी. सुध्दा झालेली आहेत. त्यांचा मुलगा एम.बी.बी.एस. करतोय. रविंद्र शिंदे यांनी जगण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे त्यांना पुढे भरभरुन लिहीता आले. त्यांच्या या कादंबरीतल्या नायकाचा प्रवास हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणी बहुजनवादी चळवळ यांच्यावर आधारीत आहे. 
कोरोणा काळात गोर गरीब जनतेकरीता रविंद्र शिंदे यांनी अतुलनिय कार्य केले. रविंद्र शिंदे सारखा एक चांगल्या आणी सहृदयी तरुणाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जवळ घेतल्यामुळे त्यांचे व्यक्तीश: आभार मानतो, असेही ते म्हणाले. 
साहित्यिक अशोक पवार यावेळी भरभरून बोलत होते. याप्रसंगी रविंद्र शिंदे यांच्या मातोश्री सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई शिंदे, नरेंद्र पढाल, रवी भोगे, सीडीसीसी बँक चंद्रपूर चे संचालक उल्हास करपे आदी उपस्थित होते.

Comments