*आयुध निर्माणी येथे महिलांची मॅरेथॉन स्पर्धा**वुमन वेल्फेअर कमिटी ऑफ चांदा तर्फे शेकडो महिलांची आरोग्य तपासणी*

*आयुध निर्माणी येथे महिलांची मॅरेथॉन स्पर्धा*

*वुमन वेल्फेअर कमिटी ऑफ चांदा तर्फे शेकडो महिलांची आरोग्य तपासणी*

अतुल कोल्हे भद्रावती - 
               आयुध निर्माणी चांदा, म्युनिशन इंडिया लिमिटेडच्या युनिटच्या 'वुमन वेल्फेअर कमिटी ऑफ चांदा च्या संयुक्त विद्यमाने महिलांची मॅरेथॉन स्पर्धचे आयोजन दिनांक १० मार्चला करण्यात आले.   या दौडमध्ये वसाहत व भद्रावती येथील 100 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.  पतंजली योगपीठ शाखेच्या सदस्यांनीही यात सहभाग घेतला.महिला दिनानिमित्त आयुध निर्माणी चांदा कॉलनीमध्ये प्रथमच अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चे महाव्यवस्थापक बिजय कुमार, अनिता कुमार  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते मॅरेथॉन शर्यत विजेत्या महिलांना योग्य ते पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  या कार्यक्रमा प्रसंगी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली  या करता श्री साई डिव्हाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर , डॉ. मोनिका कोतपल्लीवार (स्त्रीरोग), डॉ. सारंग पद्मावार (ऑर्थोपेडिक्स) आणि डॉ. श्याम मेडा (हृदयरोग) यांनी शेकडो महिलांची तपासनी केली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले.

Comments