चिरादेवी येथे सदगुरू जगन्नाथ बाबा वार्षिक सोहळ्याचे आयोजन**विविध वेशभूषा व भजनाचा गजर : भक्तीमय वातावरणात जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान*

*चिरादेवी येथे सदगुरू जगन्नाथ बाबा वार्षिक सोहळ्याचे आयोजन*

*विविध वेशभूषा व भजनाचा गजर : भक्तीमय वातावरणात जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान*

अतुल कोल्हे भद्रावती - 
               तालुक्यातील चिरादेवी येथे सदगुरू जगन्नाथ बाबा वार्षिक सोहळा १६ मार्च रोजी संपन्न होणार असून सदगुरू जगन्नाथ बाबा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य काल्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
          चिरादेवी हे आदर्श गाव म्हणून तालुक्यात व परिसरात ओळखल्या जातो. गावामध्ये मंडळांच्या वतीने व गावाच्या मदतीने विविध कार्यक्रम होत असतात. त्याचं सोबत सन २००६ पासून गावाच्या सहकार्याने मा. वासुदेव धानोरकर ( गुरूजी) संस्थापक, जगन्नाथ बाबा मंडळ चिरादेवी यांनी गाव एकत्र यावा. गावातील लोक गुण्यागोविंदाने राहावे. गावातील लोक सुखी समाधानी राहावे. हा हेतू मनामध्ये घेऊन त्यानी काही साथीदाराना सोबत घेऊन जगन्नाथ बाबाच्या मूर्ती चे प्राणप्रतिष्ठा केली आहे. 
          हाच वारसा घेऊन आजही मा. धानोरकर गुरूजी यांच्या पुढाकाराने जगन्नाथ बाबा मंडळ समिती व गावातील नागरिक गुण्यागोविंदाने स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने सेवा व योगदान देऊन वार्षिक काल्याचे आयोजन करतात.  समितीच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली असून १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते १० ग्राम सफाई (सर्व गावकरी) गाडगे महाराज्यांच्या वेशभूषा स्विकारून स्वच्छतेचा संदेश देत संपूर्ण गाव स्वच्छ केल्या जाते. व ग्रामस्वच्छता उपक्रमात जि. प. उच्च प्राथ. शाळा चिरादेवी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी उस्फूर्त सहभाग घेत असतात. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता घटस्थापना मा. श्री.वासुदेव जी धानोरकर गुरूजी ( संस्थापक, विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थान,चिरादेवी ) व समितीच्या हस्ते करण्यात येते. सायंकाळी ८:३० वाजता ह. भ. प. गुंतवत दादा कुत्तरमारे भद्रावतीकर यांचे समाज प्रबोधनपर जाहीर किर्तन संपल्यानंतर लगेच सायं. ११:३० वाजता. हरी जागरण जगन्नाथ बाबा पदावली भजन मंडळ, गोरजा यांच्या हस्ते पार पडणार आहे. दि. १६ मार्च २०२४ ला सकाळी ६-७ वाजता मूर्ती पूजा, सकाळी ९ वाजता पालखी सोहळा विविध भजनांच्या गजरात गावभर पालखी फिरणार व दुपारी ३ वाजता दहीहंडी मा. वासुदेव धानोरकर गुरूजी व जय जगन्नाथ पदावली भजन मंडळ, जय जगन्नाथ महिला भजन मंडळ व समस्त ग्रामवासी चिरादेवी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. त्या नंतर लगेचच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थान चिरादेवी च्या वतीने सर्व भाविक भक्तांनी या वार्षिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आव्हाहन विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा देवस्थान समिती व संपूर्ण चिरादेवी ग्रामवासीयांनी केले आहे.

Comments