*निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला करियर कट्टा उपक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त*

*निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला करियर कट्टा उपक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील "करियर कट्टा" या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02/03/ 2024 रोजी धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे विभागीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 मध्ये महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. 
या विभागीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा 2024 करिता अध्यक्ष मा. डॉ. उदय निर्गुडकर, स्वातंत्र्य संचालक, एम. एच. पी. सी. प्रमुख पाहुणे, माननीय डॉ  संतोष चव्हाण, सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर विभाग, नागपूर, माननीय प्रफुल पाठक, सेक्रेटरी, पावर सेक्टर स्किल कौन्सिल तथा आयोजक मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, मा. ओमराज देशमुख, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर, मा. प्राचार्य डॉ  शरयू तायवाडे, प्राचार्य प्रवर्तक, नागपूर विभाग करिअर कट्टा, मा. प्राचार्य डॉ महेंद्र ढोरे, प्राचार्य प्रवर्तक नागपूर विभाग करिअर कट्टा, मा  अजयकुमार मोहबंसी, प्राचार्य भंडारा विभाग, मा डॉ. ईश्वर मोहूर्ले, प्राचार्य गोंदिया विभाग, मा. ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, प्राचार्य गडचिरोली विभाग, मा डॉ. एल.  एस. लडके, प्राचार्य चंद्रपूर विभाग, मा. डॉक्टर प्रमोद काटकर, प्राचार्य चंद्रपूर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
तसेच करियर कट्टा विभागीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी "करिअर कट्टा" या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख व करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्रा. डॉ. अपर्णा धोटे यांना चंद्रपूर जिल्हा महाविद्यालयीन समन्वयकाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला तसेच चंद्रपूर जिल्हा करिअर कट्टा उत्कृष्ट जिल्हा समन्वयकाचा सुद्धा पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल प्रा डॉ अपर्णा धोटे यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. 
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय तृतीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके व प्रा. अपर्णा धोटे यांना चंद्रपूर जिल्हा महाविद्यालयीन समन्वयक प्रथम पुरस्कार तथा उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे व सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे यांनी अभिनंदन केले. 
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments