ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोन शोधून मोबाईल धारकास परत.*तुमचाही मोबाईल हरवला असल्यास या लिस्टमध्ये असू शकतो.*वरोरा पोलिसांची उत्तम कामगिरी*

ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून  मोबाईल फोन शोधून मोबाईल धारकास परत.*

तुमचाही मोबाईल हरवला असल्यास या लिस्टमध्ये असू शकतो.*

वरोरा पोलिसांची उत्तम कामगिरी*

वरोरा २१/३/२०२४
चेतन लुतडे 

उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम रुजू झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना काही प्रमाणात वचक निर्माण झाला असून बहुतांश अवैध धंदे बंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. याचाच परिणाम म्हणून वरोरा तालुक्यातील बहुतांश उघडपणे चालणारे अवैध धंदे पडद्याआड गेले आहे. मात्र काही मोरके जिल्हा बाहेर जाऊन आपले अवैध धंदे सांभाळत असताना दिसत आहे. 
नुकतेच वरोरा पोलिसांनी ॲप द्वारे मोबाईल धारकाचे हरविलेले  मोबाईल फोन मिळवून देण्यात यश आले आहे.

पोलीस स्टेशन वरोरा जि. चंद्रपुर हद्दीतुन हरवीलेले अँड्रॉइड मोबाईलचा CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाईन पोर्टल मार्फत शोध घेण्यात येवुन एकुन २० ऍन्ड्राईड मोबाईल ज्यात OPPO A16, Redmi Note 10, One Plus, Vivo V27, Naro 50 A, Oppo F 19 pro, Redmi 9 A, Oppo A 78, Vivo Z 13 X, Vivo Y 21, Realmi XT, Oppo A57, Тесто, Орро A38, Vivo Y 20, Vivo, Samsung A 21S, Redmi Note 9 Pro, Oppo А 17, Орро А 18 असे एकुन ३,५०,००० रू. चे ऍन्ड्राईड मोबाईल मिळुन आल्याने सदरचे मोबाईल हे मोबाईल धारक यांना पोलीस ठाणेदार अमोल काचोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे.

सदरची कारवाही मा. नयोमी साटम, भापोसे, सहा. पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे पोलीस स्टेशन वरोरा, पोहवा किशोर बोढे, पो.अं. दगडु सरवदे यांनी पार पाडली.
Comments