*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा शिव जयंती उत्सव समिती तर्फे भद्रावती येथे दिनांक २८ मार्च २०२४ ला तिथीनिहाय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव शोभायात्रेचे आयोजन संपन्न**शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा  शिव जयंती उत्सव समिती तर्फे भद्रावती येथे दिनांक २८ मार्च २०२४ ला तिथीनिहाय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव शोभायात्रेचे आयोजन संपन्न*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन*

*तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांचे नेतृत्व, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांचा पुढाकार*

भद्रावती

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वेळेस भद्रावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरीक या शोभायात्रेत सहभागी होते.
 (दि.२८) ला सायंकाळी नागमंदीर भद्रावती येथुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. 
याप्रसंगी निलेश बेलखेडे पुर्व विदर्भ सचीव युवासेना,जिल्हा महिला संघटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, जिल्हा युवा अधिकारी रोहन कुटेमाटे, भद्रावती युवा सेना अधिकारी राहुल मालेकर, अमोल मेश्रमा जिल्हा कामगार सेना प्रमुख,शिवजयंती उत्सव समिती, भद्रावती पदाधिकारी सदस्यासह अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख व माजी नगरसेवक नरेन्द्र पढाल, घनश्याम आस्वले, धनराज आस्वले, ज्ञानेश्वर डुकरे, युवा सेना सरचिटणीस येशू अरागी, युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, शिवसेना तालुका संघटक सतीश आत्राम, युवा सेना संघटक गौरव नागपुरे, राहुल खोडे, संजय उमरे, सुनील आवारी,  गोपाल सातपुते विदर्भ-जिल्हा-वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी, महीला, युवा, युवती पदाधिकारी यांच्यासह आजी माजी शिवसैनिक तसेच माजी सैनिक पदाधिकारी, शिवसैनिक तथा असंख्य नागरीक, महिला, पुरुष, युवक युवती तसेच बालगोपालांनी शोभायात्रेत सहभाग घेतला.

हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे जयंती शोभायात्रेची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
मुख्य आयोजक माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांचे अथक परीश्रमातून शिवजयंती उत्सव यशस्वी घेण्यात आली.

Comments