वरोडा : शाम ठेंगडी
वरोडा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात आज 29 फरवरी रोज गुरुवारला नील गाईचा कळप दिसून आला. शहराच्या इतक्या जवळ नीलगाईचा कळप आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वरोडा मार्डा रस्त्यावरील इंण्डेन गॅस कंपनीच्या गोडाऊन समोर असलेल्या एका शेतात आज 29 फरवरी रोज गुरुवारला दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या वाटेकरुंना पहिल्यांदा दोन नीलगाई आढळल्या. काही वेळानंतर या दोन गाईंच्या एका मागून एक नीलगाय निघून आल्या. या कळपात सहा निलगाईच्या बछड्यांसह एकूण 19 नीलगाई असल्याचे दिसून आले.
शेताच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या वनात हा कळप थोड्या वेळानंतर निघून गेला.
Comments
Post a Comment