केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह सम्मेलन सोहळा संपन्न**मित्रांच्या भेटीने भावनिक क्षण : १३० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह सम्मेलन सोहळा संपन्न*

*मित्रांच्या भेटीने भावनिक क्षण : १३० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, भद्रावती येथील सेवानिवृत्त कर्मचारी, जेष्ठ नागरिकांनी एकत्र येत स्वागत सेलिब्रेशन येथे स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दिवाकर उपासे, माजी जेसीएम थर्ड, सदस्य, प्रमुख पाहुणे सुरेश डोरले, संयुक्त सचिव, CGHS वेल्फेअर असोशिएशन, विशेष अतिथी विजय चंदावार, जिल्हा प्रभारी, पतंजली योग समिती आणि मनोहर साळवे, CGHS सल्लागार समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
     मनोहर साळवे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रीत करत स्नेह सम्मेलन सोहळा घडवून आणला. त्यांनी CGHS ची शाखा चंद्रपूर येथे सुरू करण्यासाठी अनेक समस्येला समोर जात, विविध विभागातून मान्यता कशी मिळाली त्याचा मोठा इतिहास कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सर्वांसमोर मांडला. सेवानिवृत्त होऊन ज्या सवंगड्यांचे निधन झाले त्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी मित्रांना श्रद्धांजली देण्यात आली.

      विजय चंदावार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा सांगत आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी योगा करा, आपल्याला जमेल ते किंवा आवडते काम करा, खाली बसु नका, शरिरातील आळस काढा, शक्य झाल्यास भटकंती करा, नव नवीन ठिकाणांना भेटी द्या. मन आणि शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवा असे सांगितले.

     CGHS वेल्फेअर असोशिएशनचे संयुक्त सचिव सुरेश डोरले यांनी CGHS विषयी, येणाऱ्या समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली. CGHS नॉमिनेशन, जीवन प्रमाणपत्र, पेन्शन खाते, वयाच्या ७५ वर्षानंतर पुर्ण पेन्शन, त्याबद्दल चे कागदपत्रे, लागणारे प्रमाणपत्र, यात येणाऱ्या समस्या आणि मार्ग याबाबत सुंदर, उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकर उपासे यांनी उपस्थितांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी करत असलेले कार्य याबाबत माहिती दिली.

     केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह सम्मेलन सोहळ्यात १३० सेवानिवृत्त कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये वय वर्ष ७५ आणि लग्नाला ५० वर्ष पुर्ण केलेल्या पतीपत्नी तसेच वय वर्ष ७५ पुर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी समितीकडून करण्यात आला. यावेळी सोबत एकाच ठिकाणी काम केलेले, मित्रांसमवेत टिफिन खाणारे सर्व सवंगडी भेटले. भावनांचे आदानप्रदान झाले. कोणाला त्यांचा मित्र दिसला नाही. तर कोणाला मित्राला भेटीचे भावनिक क्षण सर्वत्र दिसत होते.

     स्नेह सम्मेलन सोहळा आयोजन केला, त्यानिमित्ताने सर्व मित्रांती भेट झाली, मित्रांच्या परिवाराची भेट झाली. याबद्दल सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्त जेष्ठांनी केले. यासाठी केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी, जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणी यांनी खुप मेहनत घेतली.

Comments