*राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा इशारा*
अतुल कोल्हे भद्रावती :-
भद्रावती नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे व अन्य सुविधा देण्यात याव्या या संदर्भात शहरातील शासकीय विश्रामगृहात कंत्राटी कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय कर्मचारी सेनेद्वारे बैठक घेण्यात आली. येत्या काळात सदर कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करण्यात न आल्यास या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे या बैठकीत देण्यात आला. सदर कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे अशी राष्ट्रीय कर्मचारी सेनेची मागणी आहे. या संदर्भात संघटनेतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. याची दाखल घेत कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालयात एक बैठकही आयोजित करण्यात आली. या बैठकीत सदर मागण्यांवर चर्चा करण्यात आली.याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा या मागण्यांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली व याविषयी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर भद्रावती येथील शासकीय विश्रामगृह सदर कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या बैठकीतून देण्यात आला. बैठकीला कंत्राटी कर्मचारी संदीप चटपकर, राजेश चव्हाण, अजय खांदारे, धनु माशीरकर, अजय सोनुने, दिलीप पचारे, धीरज मेश्राम तथा इतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment