अतूल कोल्हे भद्रावती
दिनांक 03 मार्च 2024 रोज रविवारला मोहनदास हनुमान ठाकरे राहणार चिरादेवी या शेतकऱ्यांनी आपला कापूस वसंता माणिक वंजारी रा. मेसा यांना विकत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की वजन काट्यामध्ये मध्ये फरक आहे. असे त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना म्हटले. परंतु ते व्यापारी समजायला तयार नव्हते. त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सचिव श्री. नागेश पुनवटकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ बाजार समितीचे निरीक्षक श्री. संजय शेंडे लिपिक श्री. विलास पालकर यांना बोलावून श्री. मोहनदास हनुमान ठाकरे रा. चिरादेवी यांचे घरी जाऊन श्री. वसंता माणिक वंजारी रा. मेसा कापूस खरेदी करत असताना त्यांच्यावर बाजार समितीच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करून दंड, बाजार फी, सुपरव्हिजन फी, अशी एकून रक्कम 15000/- रुपये वसूल करण्यात आले. यापुढे भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस व अन्य शेतमाल विकू नये, शेतमाल खरेदी करताना आढळल्यास, बाजार समितीच्या नियमानुसार व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा, नंदोरी येथेच विकावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर ताजणे, उपसभापती सौ.अश्लेषा भोयर (जीवतोडे ) सचिव नागेश पुनवटकर व बाजार समितीचे सर्व संचालक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment