अतुल कोल्हे भद्रावती :-
दिनांक १ मार्च २०२४ रोज शुक्रवार ला संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी भद्रावती शहरात मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.
या पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव चित्रीव अध्यक्ष भद्रावती सुवर्णकार समाज तर उद्घाटक प्रफुल चावरे चं. जि. सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कु.शिवानी पांढरे रिपोर्टर ABP माझा पुणे, मयूर फटीक CA , अतुल नरुकर सेवा परीक्षा ॲड. प्राशिष ताठे, संदीप चावरे, विनोद पांढरे, सुमेध कासुलकर, सौ. वृषालीताई पांढरे, सौ मनिषताई ढोमने, सौ कल्पनाताई रोकडे, सुभाषराव रोकडे तसेच आशिष यमनुरवर हे होते. या वेळी मार्गदर्शन करताना प्रफुल चावरे तसेच मयूर फटीक, अतुल नरूकर, कु. शिवानी पांढरे यांनी युवकांना आपले कार्यक्षेत्रात कश्या प्रकारे प्रावीण्य करावे व समाजासाठी आम्ही सदैव पाठीशी राहु याची माहिती दिली.
या कार्यक्रमात प्रशिष ताठे, कासुलकर, विनोद पांढरे, सौ. रोकडे, व सौ. ढोंमने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षीय भाषण विजयराव चित्रीव यांनी केले. प्रास्ताविक उमाकांत कुर्वे व आभार प्रदर्शन मोहन पांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.स्नेहल कुर्वे व किशोर पांढरे यांनी केले.
या पुण्यतिथी सोहळ्यातनसमाजातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल देवून तसेच गुणवंतांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
शहर व तालुक्यातील सर्व छोट्यां पासून तर वृद्धांपर्यंत समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.
यानंतर लहान मुलं, युवक, युवती तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यासाठी सर्व समाजातील बांधवांनी उत्तम सहकार्य केले
यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रामाची सांगता करण्यात आले.
कार्यक्रमा करिता चंद्रपूर येथिल समाज बांधवांनी उपस्थिती दिली.
या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता सुवर्णकार समाज कार्यकारिणी, नरहरी सेना,महिला कार्यकारिणी यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment