चेक तिरवंजा कवटी येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट**स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण समृध्दी योजना” उपक्रम*

*चेक तिरवंजा कवटी येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण समृध्दी योजना” उपक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती :
          तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या युगात पुढे जावे, कुठेही ज्ञानाअभावी कमी पडू नये या उदांत हेतुने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण समृध्दी योजना” उपक्रम अंतर्गत चेक तिरवंजा कवटी येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्यात आली.
समाज सेवेचे व्रत अंगीकृत असलेले व कोरोणा काळापासून घेतलेले मावसेवेचे व्रत अविरत सुरु ठेवण्याकरीता तसेच समाजसेवा व मानवसेवा यास साजेसा “एक हात मदतीचा” हे ब्रीदवाक्य घेवून “आत्मविश्वास बाळगा, हिच खरी आपली ताकत” असा संदेश देत अविरत कार्य करीत असलेली रविंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतुन साकार झालेले स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर. 
समाजातील दिन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषीत, शेकरी-शेतमजुर, निराधार, दिव्यांग, महिला, विद्यार्थी, गंभीर आजारी रुग्ण आदीसाठी ट्रस्टव्दारे विविध योजना उपक्रम चालविल्या जात आहेत. यामध्ये श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म ना पावडे क्रिडा स्पर्धा योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, वंदनीय राष्ट्रसंत तुकाडोजी महाराज शिक्षण संमृध्दी योजना, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना असून याचा नागरीकांना लाभसुध्दा मिळत आहे.
असेच ट्रस्टचे एक उपक्रम “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण समृध्दी योजना” अंतर्गत तालुक्यातील चेक तिरवंजा कवटी येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षा पुस्तके ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. वाचनालयातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेले अभिषेक ताजणे, शंकर उपरे, यश चौधरी, वेदांत सोनटक्के यांनी स्वीकारली.
ट्रस्टव्दारा चालविण्यात येणारे उपक्रम अभियानांचा समाजातील नागरीकांनी लाभ घेण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी यावेळी सांगीतले आणी ट्रस्ट गरजू, गरीब नागरीकांना नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. 
याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक सदस्य तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख तथा भद्रावती कृउबास सभापती भास्कर ताजणे, उपशहर प्रमुख अरुण घुगुल, जि.प. नंदोरी-कोकेवाडा विभाग समन्वयक हरीभाऊ रोडे, ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर तसेच ट्रस्टचे गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.


Comments