वरोरा
चेतन लुतडे
वरोरा शहरात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले. यावेळी वरोरा शहरातील मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी संध्याकाळी शिवजयंती निमित्त वरोरा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शिंदे गट व शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानीय आंबेडकर चौक येथे मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉक्टर विवेक तेला यांनी शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीचे अभिनंदन केले. याहीपेक्षा मोठे कार्यक्रम शहरात आयोजन करण्याचे मानस त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सागर वझे यांनी शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून दाखवला.
आंबेडकर चौक इथून निघालेल्या भव्य शोभा यात्रेदरम्यान शिवाजी महाराजांचे वेशभूषा परिधान करून भव्य शोभा यात्रेची आयोजन वरोरा शहराच्या मध्यभागातून करण्यात आले होते यावेळी पारंपरिक पद्धतीने भजन मंडळी लोकांचे आकर्षण बनले होते. तर दुसरीकडे बॅन्जोच्या तालावर वरोरा शहरातील तरुणाई शिवजयंती निमित्त आनंदोत्सव साजरा करीत होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे दहा वाजता कार्यक्रम बंद करण्याचा आदेश पोलिसांनी दिल्याने तरुणांच्या आनंदावर विरजण घातले. यावेळी अल्पोहाराचा कार्यक्रम शिवभक्तांसाठी करण्यात आला होता.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी संचालन करताना मराठी अस्मितेचा असलेला हा सन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी सहकार्य करणार्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानले.
शिवजयंती उत्सव समिती वरोरा च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सागर वझे, प्रमुख पाहुणे विवेक तेला, तालुकाप्रमुख श्रीकांत खंगार, राजेश डांगे, विलास परचाके, सिंगलदिप पेंदाम, सुरेश महाजन, बाबाभाऊ भागडे, उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर खापटे, उज्वलकर, बुचे, आसाराम रोडगे, विनोद लोहोकरे, संजू राम, राहुल बांदुरकर, जितेंद्र असेकर, बीडवाईक, बाबा भाऊ उपरे, चेतन भोंगडे, लकी पवार, निशान मोडक, विक्रांत झाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा सादर करणारे सारंग भोयर, उज्वल लोहकरे, सौरभ लोहकरे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment