*घोडपेठ येथे पर्यावरणपूरक होळी साजरी*
अतुल कोल्हे भद्रावती :-
होळीच्या महान पर्वावर व्यसनाची होळी करुन समाजात प्रेमाची ऊधळन करा व रंगमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करा असे आवाहण गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तथा समाजसेवक अशोक येरगुडे यांनी केले.तालुक्यातील घोडपेठ येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे गावात रंगमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी गावातील प्रमुख रस्त्यांवरुन सकाळच्या वेळेस प्रभातफेरी काढण्यात आली.या प्रभातफेरीत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा गावातील नागरीक उपस्थीत होते.सकाळी गावात ग्रामसफाई अभियान राबविण्यात आले.याअंतर्गत गावातील केरकचरा साफ करुन त्याची होळी करण्यात आली.यावेळी वंदनीय तुकडोजी महाराजांना अपेक्षीत असलेले गाव निर्माण करण्याचे गुरुदेव सेवा मंडळातर्फे आवाहन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा गावातील नागरीक उपस्थीत होते.
Comments
Post a Comment