अतुल कोल्हे भद्रावती :
तालुका अधिवक्ता सघाच्या दिनांक २२ मार्चला निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. मिलिंद रायपूरे हे ४९ पैकी ३५ मते घेवून तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर ॲड. विजय मत्ते सचिव म्हणून निवडून आले. सदर निवडणूक प्रक्रियेत ॲड एम. आर. शेख यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. किशोर धोटे, व ॲड. ओमप्रकाश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांच्या या विजयाचे ॲड.उदय पलिकुंडवार, ॲड. भूपेंद्र रायपुरे, ॲड. प्राशिष ताठे, ॲड.कुणाल पथाडे, ॲड.सुनील नामोजवार, ॲड.अर्चना आगलावे, ॲड.राजू सपकाळ, ॲड. भडगरे, ॲड. कविश्वर चालखुरे व अन्य सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment