नाल्यात कार कोसळून पेट घेतल्याने अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू* *कोंढा नाल्यावरील घटना : मध्यरात्री घडली घटना*

*नाल्यात कार कोसळून पेट घेतल्याने अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू*

 *कोंढा नाल्यावरील घटना : मध्यरात्री घडली घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-


              
                   नागपूर  चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळून तिने पेट घेतल्याने आगीत होरपळून सीआयएसएफ जवान दिपक बघेल वय 35 वर्षे राहणार मल्हारीबाबा सोसायटी, सुमठाना भद्रावती निवासी यांचा मृत्यु
 झाल्याची घटना दिनांक 8 रोज शुक्रवारला सकाळी 7:00 वाजताच्या सुमारास शहरानजीक असलेल्या कोंढा नाल्यात उघडकीस आली.
             या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या मृत चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे रात्रो मध्यरात्रीनंतर गाडी क्रमांक 23 बी एच 6855 सी या मारुती इग्नेश ही कार नागपूर कडून चंद्रपूरकडे जात असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यावर या कारने पेट घेतला. चालकाने कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर निघता न आल्याने कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


Comments