वेणा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई* *एक कोटी पेक्षा अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त* *सात जणांवर गुन्हा दाखल*

*वेणा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई* 

*एक कोटी पेक्षा अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त*
     *सात जणांवर गुन्हा दाखल*
 वरोडा : श्याम ठेंगडी 
        वरोडा तालुक्यातील नदी,नाले यांच्या पात्रात  रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून रेतीची तस्करी करणाऱ्यांवर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम ह्या धडक कारवाई करत असतानाही रेती तस्कर मात्र विविध प्रकारच्या युक्त्या वापरून आपला व्यवसाय करीत आहेत.
      आज 2 मार्च रोज शनिवारला पहाटे वरोडा तालुक्यातील येवती येथील वेणा नदीच्या पात्रात रेतीचे अवैध उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच  पोलिसांनी पहाटे 5 वाजता  टाकून  1,06,15000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा नोंदविला.
       पोलिसांना  मिळालेल्या माहितीच्या आधारे पहाटे पाचच्या सुमारास वेळा नदीच्या मारुती देवघटावर जाऊन छापा टाकला असता त्यांना तेथे जेसीबीच्या साह्याने रेतीचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी कारवाई करत जेसीबी मशीन सह दोन हायवा, एक ट्रॅक्टर, पाच मोबाईल व आठ ब्रास रेती असा एकूण एक कोटी सहा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी विशाल मारोती बदकल राहणार माढेळी, गजानन विठ्ठल येडमे राहणार वंधली, भोला आत्राम राहणार बोरी,लंकेश चंपतराव बदकल राहणार येवती, ओमप्रकाश साहू ,विकासकुमार व गज्जू मांरूडकर राहणार नागरी या सात आरोपी विरोधात भादंविच्या 379 ,34 याचेसह महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या सहकलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      सदर धडक कारवाई येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बल्की,धनराज गेडाम, विठ्ठल काकड भाऊराव हेपट, रमेश कार्लेवाड, महेश गावतुरे यांनी केली.
      येथील पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे हे घटनेचा पुढील तपास करीत आहे.

Comments