कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

ना.सुधीर मुनगंटीवार यांचे भद्रावती येथे भाजप तर्फे जंगी स्वागत*

*ना.सुधीर मुनगंटीवार यांचे भद्रावती येथे भाजप तर्फे जंगी स्वागत*

अतुल कोल्हे भद्रावती.
               चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रथम आगमनानिमित्त राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शहरातील पेट्रोल पंप चौकात भाजप तर्फे भव्य स्वागत करण्यात आले.  यावेळी त्यांनी स्वागत सेलिब्रेशन सभागृहात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या आगमनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा तथा फटाक्यांच्या आतिषबाजीत आपला आनंद व्यक्त केला.सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी भाजपचे चंद्रकांत गुंडावार,अमित गुंडावार,प्रशांत डाखरे, इमरान खान, अफजल भाई, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे,  सुनील नामोजवार, विजय वानखेडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments