श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा व्दारा घुगरी काल्याचे आयोजन**सीडीसीसी बँक चंद्रपूर माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले मार्गदर्शन*

*श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा व्दारा घुगरी काल्याचे आयोजन*

*सीडीसीसी बँक चंद्रपूर माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले मार्गदर्शन*

अतुल कोल्हे भद्रावती :
            तालुक्यात 16 तारखेला श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा यांच्या नावाने पुजा अर्चना व काल्याचे आयोजन केल्या जाते. याच अनुषंगाने भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा (तु.) येथे श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा व्दारा भजन, घुगरी काला व महाप्रसादाचे आयोजन केले. यावेळी सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे संस्थापक रविंद्र शिंदे यांची या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकेवाडा (तु.) येथे श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा व्दारा दि. 15 ला जागृती भजन तसेच दि. 16 ला प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन तसेच भजन, घुगरी काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर, सोबतच सुधाकर रोहणकर, राजेन्द्र ताजणे गुरुजी मंचावर उपस्थित होते.
विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा यांच्या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन, प्रतिमेला पुष्प माला अर्पण करीत पुजन करुन सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थिती मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित मंडळाचे सदस्य तसेच गावकरी महिला पुरुष बालगोपालांना मोलाचे मार्गदर्शन केले. यापश्चात श्री गुरुदेव भजन मंडळ कोकेवाडा (तु) तसेच श्री गुरुदेव भजन मंडळ अर्जुनी व इतर उपस्थित भजन मंडळानी उत्कृष्ठ भजन सादर केले. या नंतर घुगरी काला व महाप्रसादाचा लाभ उपस्थित भक्त व गावकरी मंडळ यांनी लाभ घेतला.
श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा (तु.) अध्यक्ष मधुकर पोहीनकर, उपाध्यक्ष सुधाकर रोहणकर, कोषाध्यक्ष केशव विरुटकर, सचिव गुणवंत चिकटे यांच्यासह देवस्थान कमिटीचे सदस्य किशोर पडवे, विजय वैरागडे, धनराज गुरुनुले, मोतीराम शेंडे, बालु मंगाम, सपना कुमरे, प्रिती सोयाम तसेच सेवाधारी शंकर पोहीनकर आदी कार्यक्रमाच्या सफलतेकरीता मेहनत घेतली, समस्थ गावकरी यांच्या उपस्थितीत घुगरी काला आयोजन करीत अंतत महाप्रसादाने कार्यक्रमाचे समापण करण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येन भाविक भक्त व गावकरी उपस्थित होते.

Comments