नेताजी शाळेच्या जागेवर आधुनिक बस स्थानक बनवा**जागृती सामाजिक संघटनेची मागणी*

*नेताजी शाळेच्या जागेवर आधुनिक बस स्थानक बनवा*

*जागृती सामाजिक संघटनेची मागणी*

वरोरा : वरोरा येथील बस स्थानक आणि नेताजी शाळा यांच्या जागेची अदला-बदली करुण नेताजी शाळेच्या जागेवर आधुनिक बस स्थानक आणि बस स्थानकाच्या जागेवर नेताजी शाळा जिल्ह्यात तसेच राज्यात मॉडेल बनेल अशी बंविन्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षा पासून जागृती सामाजिक संघटना करीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते, तत्कालीन आमदार बाळूभाऊ धानोरकर, तत्कालीन खासदार हंसराज अहीर, आमदार प्रतिभा धानोरकर, संध्याताई गुरनुले तत्कालीन अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना गेली पाच वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.
बस स्थानक समोर ओवर ब्रिज बनल्यापासून बस स्थानकाला अडथळा निर्माण झालेला आहे. बस स्थानकावर आलेली बस शाहिद योगेश डाहुले चौकातुन फिरून जावे लागत आहे. यात वेळेचा व इंधनाचा खर्च वाढलेला आहे. यात शाहिद योगेश डाहुले चौकातुन फिरून जात असताना अपघाताची शक्यता आहे. याचमुळे परिवहन महामंडळने जागेच्या अदला-बदलीला समर्थन दर्शविले आहे. जिल्हा परिषदेकडून अदला-बदलीला अजुन परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिलताच बस स्थानक नेताजी शाळेच्या जागेवर येईल.

नागपूर-चंद्रपूर हाईवे रोडवर नेताजी शाळा असून सध्या विद्यार्थी संख्या नसल्यामुळे शाळा बंद करण्यात आली होती. नेताजी शाळा जिल्ह्यात तसेच राज्यात मॉडेल बनेल अशी बविन्यातयावी त्यामुळे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. काही वर्षापुर्वी नेताजी शाळा वरोरा शहरात अंवल नंबरवर होती. जागेची अदला-बदली झाल्यास नेताजी शाळा पुन्हा अंवल नंबरवर येण्याची पुरेपुर संभावना आहे.

बस स्थानक आणि नेताजी शाळा यांच्या जागेची अदला-बदली करुण नेताजी शालेच्या जागेवर आधुनिक बस स्थानक आणि बस स्थानकाच्या जागेवर नेताजी शाळा जिल्ह्यात तसेच राज्यात मॉडेल बनेल अशी बविन्यातयावी याकरीता सुधिर मुनगंटीवार मंत्री तथा पालकमंत्री यांनी लगेच तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब आणी मुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेशी पत्रव्यवहार केला. सदर मागणी प्रविण धनवलकर, अध्यक्ष, जागृती सामाजिक संघटना यांनी केली आहे. मागणीत सहभागी अमित चवले, मारोतराव कुरेकार, प्रविण सुराणा, मनिष जेठानी, डॉ. राजेन्द्र धवस, विलास नेरकर, योगेश डोंगरवार इत्यादी लोकांनी केली आहे.

Comments