मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरोऱ्यात महिलांकडून सत्कार*सीएम चषकचे वितरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरोऱ्यात महिलांकडून सत्कार
*सीएम चषकचे वितरण

वरोरा : बॉटनिकल गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परतीच्या प्रवासात रात्री दहा वाजताच्या सुमारास वरोरा येथे आयोजित कार्यक्रमात महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण करून नागपूरकडे परतताना रात्री दहा वाजताच्या सुमारास आनंदवन चौकामध्ये आयोजित कार्यक्रमाला ते आले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव आणि चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय पैतवार उपस्थित होते. आनंदवन चौकामध्ये त्यांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या प्रचंड आतिशबाजीमध्ये  शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक करोड अंशी लाख रुपयांचा विकास निधी टिळक वार्डातील गाडगे नगर, श्रीकृपा नगर तसेच सरदार पटेल वार्डातील गजानन नगर मध्ये रस्त्यांच्या विकास कामाकरिता उपलब्ध करून दिला असल्याने सदर परिसरातील विजया गुंडावार, ज्योती मत्ते , विशाखा लुतडे, उर्मिला नलगंटीवार , रेखा धारापुरे ,विजया गोंडे, कल्पना सौरंगपते, जानवी मत्ते, लता गोंडे यांच्यासह इतर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वरोरा येथे आयोजित "सीएम चषक" ३५ वर्षावरील पुरुषांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या तालुका क्रीडा संकुल संघाला स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 सदर पुरस्कार टिकेएस संघाचे कर्णधार शैलेश नक्षीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरोरा भेटी प्रसंगी अनेक नागरिकांनी त्यांना समस्यांचे निवेदन सादर केले. यात तुमगाव ग्रामस्थांनी डॉक्टर विवेक केला यांच्या नेतृत्वात उमरी-तुमगाव पाझर तलावा करिता निधी उपलब्ध करून कामाची पूर्तता करण्याची मागणी निवेदनातून केली. पोलीस व सैन्य भरतीत मध्ये वयोमर्यादेत वाढ करावी अशी मागणी युवकांतर्फे करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कला ,कार्यानुभव व शारीरिक शिक्षकांची पदे भरण्यात यावी अशी मागणी विशाखा लुतडे, अमोल आवारी, उर्मिला नलगंटीवार, सागर आणि इतर शिक्षकांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली. यासोबतच अन्य काही नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने मुख्यमंत्र्यांना सादर केली. सदर कार्यक्रमात गोंडवाना गणतंत्र गणतंत्र पार्टीचे विलास परचाके यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश घेतला. सदर कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह आशिष ठेंगणे, श्रीकांत खांगार,राजेश डांगे, कमलकांत कळसकर, कल्पना भुसारी,प्रतिमा ठाकूर,भरत गुप्ता, कमलेश शुक्ला, श्रेयांश ठाकूर, ॲड मधुकर फुलझेले,विलास वायधुळे, सिंगल्डीप पेंदाम,विलास परचाके, निलेश मत्ते, जितेन्द्र आसेकर, रवींद्र शिंदे, विनोद नंदुरकर, समीर हक्के, समीर बराई, ठाकूरदास चांडक, प्रशांत बावणे,सचिन जरे,चेतन भोंगडे, निशांत मोदक,प्रवीण आत्राम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments