वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

श्री. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरी रे. पतसंस्थाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र नेमाडे यांची नियुक्ती

श्री. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरी रे. पतसंस्थाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र नेमाडे यांची नियुक्ती 

वरोरा
चेतन लुतडे वरोरा

 दि. 09/03/2024 रोज शनिवारला श्री. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी रह. पत संस्था वरोरा र.नं. 617 या पत संस्थेची निवडणुक अधिकारी श्री. एस. एस. बोधे यांच्या हस्ते पार पडली. त्यामध्ये श्री. नरेंद्र प्रभाकर नेमाडे अध्यक्ष्य म्हणुन व उपाध्यक्ष पदी श्री. जनार्धन जागोजी डुकसे यांची सर्वानुमते निवड झाली. त्यावेळेस श्री. पितांबर जगन्नाथ साखरकर (संचालक), श्री. रामदास नानाजी धोबेः (संचालक), श्री. शांताराम गणपत बरबटकर, (संचालक), श्री. बंडू विठ्ठल निखाडे, (संचालक), श्री. अनिल बापुराव काळे, (संचालक), श्री. प्रभाकर उध्दवराव ढाले. (संचालक), श्री. गौतम विश्वनाथ दारूंडे. (संचालक), सौ. उज्वला राघोबा बोबडे. (संचालीका), सौ. वनिता विलास कष्टी. (संचालीका), सभेला उपस्थीत होते.
तसेच अध्यक्ष श्री. नरेंद्र प्रभाकर नेमाडे यांनी संस्थेला पुढील प्रगतीबाबत वाटचाल करण्याकरीता आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व संचालक मंडळ व निवडणुक अधिकारी यांनी मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष महोद्याचे स्वागत करूण पुढील वाटचालीकरीता शुभेच्या दिल्या.

Comments