तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मोलमजुरी करीता आलेल्या नातेवाईकांनेच केला अत्याचार**मुलगी चार महिन्याची गर्भवती*

*तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मोलमजुरी करीता आलेल्या नातेवाईकांनेच केला अत्याचार*

*मुलगी चार महिन्याची गर्भवती*

अतुल कोल्हे:-

                तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षे अल्पवयीन मुलीवर तिथे घरी राहणाऱ्या १९ वर्षीय नातेवाईकाने गेल्या आठ महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने  गुरुवारला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
           पवन हनुमान नागोसे वय १९ वर्षे राहणार मारेगाव जिल्हा यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. पवन हा आपल्या नातेवाईकाकडे राहून मोलमजुरीचे कामे करीत होता. यात त्याने येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी संबंध जुळवून गेल्या आठ महिन्यापासून अत्याचार केला. यात ती चार महिन्याची गरोदर राहिली याची माहिती आई-वडिलांना माहित झाल्यानंतर त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी राहुल किटे करीत आहे.Comments