75-वरोरा भद्रावती विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने शिवालय येथे महिला दिन उत्सावात साजरा*

*75-वरोरा भद्रावती विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने शिवालय येथे महिला दिन उत्सावात साजरा*

*शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचा पुढाकाराने महिलांकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*
वरोरा:
8 मार्च ला महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा देऊन त्यात यश मिळविले. त्यामुळे 8 मार्च हा जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचा उद्धेश हा महिलांना विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरित करणे व त्यांना प्रेरणा हा होता आणि या वर्षी जागतिक महिला दिन #Inspire Inclusion या theam अंतर्गत जगभरात साजरा करण्यात आला. त्यामुळे या दिनाचे  औचित्य साधत महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने आज दि.11 ला शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर व महिला आघाडी यांच्या संकल्पनेतुन साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकरीता चंद्रपूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरूवात माता आई भवानीची पुजा व आरती करुन करण्यात आली. त्यानंतर दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली यावेळी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. आयोजीत स्पर्धेमध्ये संगित खुर्ची स्पर्धा, आहार प्रदर्शनी कार्यक्रम, कला प्रदर्शनी, महिलांची पथनाट्य, महिलांचे प्रबोधनात्मक नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. यामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिस सुध्दा देण्यात आले. त्यात संगित खुर्ची स्पर्धेत वैशाली दरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शारदा मातकर यांनी दुसरा क्रमांक मिळविला. आहार प्रदर्शनी स्पर्धेमध्ये भावना खोब्रागडे, हेमाताई पेटकर, माया सिडाम, शिलाताई आगलावे, तेजस्विनी चंदनखेडे, लताताई दाते या महिलांनी भाग घेतला तर प्रबोधनात्मक नृत्य प्रकारामध्ये जागृती गुरनुले, मनिषा सावसाकडे, बिंदीया पुंजलवार, राणी बागेसर, सरला मालोकर, या महिलांनी सहभाग नोंदविला. सर्व सहभाग घेतलेल्या महिलांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण करण्यात आले. 
यावेळी कायक्रमाचे प्रमुख पाहुणे सुषमाताई साबळे यांनी महिलांनी आपली प्रगती कशी साधावयास हवी तसेच स्वत: आत्मनिर्भर होऊन कुटूंबाची जबाबदारी कशा प्रकारे सांभाळली पाहिजे, स्त्रीयांनी कुणावरही अवलंबुन राहु नये, लघुउद्योगाच्या माध्यमातुन आपला व आपल्या परिवाराचा विकास साधावा यावर मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर स्त्री ही कोणत्याही पुरूषापेक्षा कमी नसुन स्त्री हि पुरूषाच्या खाद्यांला खांदा लावुन परिवाराचे पालन-पोषण करु शकते याप्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी सुषमाताई साबळे, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख, महिला आघाडी, नर्मदाताई बोरेकर, चंद्रपूर जिल्हा संघटीका, (वरोरा,चिमुर, ब्रम्हपुरी विधानसभा), उज्वलाताई नलगे, चंद्रपूर जिल्हा संघटीका, (चंद्रपूर, राजुरा, बल्लारपुर विधानसभा), रविंद्र श्रीनिवास शिंदे, विधानसभा प्रमुख, दत्ताभाऊ बोरेकर, तालुका प्रमुख, वरोरा, सुषमाताई श्रीनिवास शिंदे, माजी नगरसेविका तथा सदस्या, वि.का.सह. संस्था, भद्रावती, निलीमाताई शिंदे, प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवती अधिकारी तथा सरपंच, ग्रा.प.महाडोळी, मायाताई नारळे, उपजिल्हा संघटीका, अश्लेषा जिवतोडे (भोयर), उपसभापती, कृ.उ.बा.स.भद्रावती तथा युवती जिल्हा समन्वयक, भावनाताई खोब्रागडे, मालाताई दासगुप्ता, गायत्रीताई यमलावार, विभाग संघटीका, माजरी पाटाळा जि.प.क्षेत्र शुभांगीताई अहिरकर, शहर संघटीका, वरोरा, शिलाताई आगलावे, शहर प्रमुख, वैशाली दरेकर, सरपंच, ग्रा.प.आठमुर्डी, साक्षी कुंभलवार, उपतालुका संघटीका, स्मिता ताटेवार, उपशहर संघटीका, साक्षी वैद्य,  प्रमोदजी वाघ, विभाग समन्वयक, खांबाडा आबमक्ता जि.प.क्षेत्र, अनिल सिंग, अभिजीत कुडे, विधानसभा युवाधिकारी, युवासेना, रोशन भोयर, पवन महाडीक, तथा समस्त पदाधिकारी, महिला आघाडी, युवा-युवती सेना आणि महिला शिवसैनिक उपस्थित होते.

Comments