वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

कार -ट्रेलरच्या अपघातात 28 वर्षे युवकाचा मृत्यू**भद्रावती येथील कोंढा फाट्याजवळील घटना*

*कार -ट्रेलरच्या अपघातात 28 वर्षे युवकाचा मृत्यू*

*भद्रावती येथील कोंढा फाट्याजवळील घटना*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                  समोर जात असलेल्या ट्रेलर ट्रकला त्याच दिशेने मागून जा त असलेल्या कारची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 22 रोज शुक्रवारला रात्रो दहा वाजता चंद्रपूर -नागपूर हायवेवरील कोंढा फाट्याजवळ घडली. अभिजीत गिरीधर थिपे वय 28 वर्षे, राहणार मंजुषा लेआउट, भद्रावती असे या मृतक युवकाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार सदर युवक हा एमएच ३४ ए एम 22 37 या क्रमांकाच्या कारणे एकटाच वरोऱ्याकडे जात होता. समोर जात असलेला एमएच ४६ बीएफ ३८ ४९ या क्रमांकाचा ट्रेलर ट्रक यु टर्न घेत असताना मागून जात असलेली ही कार ट्रेलरच्या मागच्या भागाला आदळली. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


Comments