सर्व रोग निदान व मोफत उपचार शिबिराचे आयोजन*
240 रुग्णांनी घेतलेला लाभ.
वरोरा
चेतन लुतडे
(दि .16 मार्च) :- स्थानिक वरोरा आनंद लॉज येथे गिव इंडिया आणि हेल्पएज इंडिया तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानी सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.
यात 240 हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोफत उपचार व मोफत औषधं वाटप करण्यात आली .
राशेदा शेख प्रमुख सामाजिक संरक्षण अधिकारी हेल्पेज इंडिया यानी या शिबिरा चे नियोजन केले.
या शिबिरात वरोरा तालुक्यातील अनेक गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून
रक्तदाब ,मधुमेह बरेच दिवसाचे ताप किडनीचे आजार हृदयरोग वारंवार चक्कर येणे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया यावर उपचार तसेच संधिवात मणक्याचे आजार वाकलेली पाय फ्रॅक्चर हाडांचे सर्व आजार यावर उपचार करून औषधोपचार करण्यात आले. यासोबत स्त्रियांविषयी असणारे आजार मासिक पाळीचे आजार व महिलांचे आजार अशा अनेक आजारावर उपचार करून औषधं मोफत देण्यात आले. यावेळी अनेक रुग्णांना त्यांच्या उपचाराकरिता विशेष मार्गदर्शन करून
वृद्ध रुग्णांना मोफत व्हील चेअर,वॉकर गुडघ्याची टोपी .चालण्याची काठी .व डोळ्याचे नंबरचे चष्मे मोफत देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सामजिक कार्यकर्ते . तथा माजी सभापती आरोग्य बांधकाम वरोरा शेख जैरुद्दिन छोटूभाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर राजरत्न मून वरोरा एम एच यू , यादव घ्यार , सामजिक कार्यकर्ता वरोरा तसेच श्री मुरलीधर उमाटे , सामाजिक कार्यकर्ता, वैभव देठे ,संदीप काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राशेदा शेख यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन चांगल्या कामगिरी करिता सन्मान करण्यात आला.
या शिबिरा करिता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आदित्य काळे ,जनरल फिजीशियन डॉ. विजय कुमार,कल्याणी शिंदे स्त्रीरोग तज्ञ , डॉ विजय कुमार, श्वेता अलोने नेत्ररोग, इत्यादी अधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी . माधवी ग्यार, शैलजा वैद्य, फिरोज शेख, रेहान शेख, कम्मु शेख , समयरा, शाहबाझ शेख ,असिफ शेख, गुलणाज शेख , रोशन शेख इत्यादी सह गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment