कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

जुगार खेळणाऱ्या 15 आरोपींवर पोलिसांची कारवाई*

*जुगार खेळणाऱ्या 15 आरोपींवर पोलिसांची कारवाई*


वरोडा :-शाम ठेंगडी
        वरोडा पोलिसांनी तालुक्यातील टेमुर्डा गावामागील झुडपात पैसे घेऊन सट्टापट्टीच्या आकड्यावर खेळणाऱ्या 15  व्यक्तींवर कारवाई करत चार लाख 48 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत  आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.
वरोडा पोलिसांना 1मार्च रोज शुक्रवारला  टेमुर्डा गावामागील झुडपी परीसरात काही जण सट्टापट्टीच्या आकडयावर पैसे घेवून हारजीतचा जुगार खेळत  आहे अशी गुप्त माहिती  प्राप्त झाली.
        या माहीतीचे आधारे येथील पोलीसांनी सापळा रचून घमटनास्थळावर छापा टाकला व पोलिसांनी घटनास्थळावरून ११ मोटारसाईकल, आरोपींचे मोबाईल, नगदी रोख २५,०००/रू असा एकूण ४,४८,३३५/- रू चा मुद्देमाल जप्त करून १५ आरोपींवर कार्यवाही केली.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, नापोअं मोहन निशाद, पोअं. शशांक बदामवार, फुलचंद लोधी यांनी पार पाडली.





Comments