पिर्ली सेवा सहकारी संस्थेच्या नविन इमारतीचे लोकार्पण संपन्न**चंद्रपूर सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

*पिर्ली सेवा सहकारी संस्थेच्या नविन इमारतीचे लोकार्पण संपन्न*

*चंद्रपूर सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

भद्रावती : अतूल कोल्हे 
तालुक्यातील 1959 साली स्थापन झालेली पिर्ली सेवा सहकारी संस्था मर्या. पिर्ली ही संस्था यांनी स्वनिधीतुन बांधकाम केलेल्या नविन इमारतीचे आज लोकार्पण व वास्तुपुजन कार्यक्रम संपन्न झाला. 1959 साली स्थापन झालेल्या आणी 64 वर्षे शेतकरी बांधवाना अविरत सेवा देत असलेल्या या नविन वास्तुचे दि. 12 ला शेतकऱ्यांना पुढेही निरंतर सेवा देण्याकरीता दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
पिर्ली सेवा सहकारी संस्था मर्या. पिर्ली  हि संस्था 1959 साली स्थापन करण्यात आली होती. शेतकऱ्यांना 64 वर्षापासून अविरत सेवा देत आहे. प्रामाणिकपणे कार्य करीत असून संस्थेनी स्वनिधीतुन नविन वास्तु उभी करत या नविन वास्तुचे आज लोकार्पण केले.
या लोकार्पण कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी भद्रावती कृउबास सभापती भास्कर ताजणे तर दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी उद्घाटन केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावती कृउबास संचालक गजानन उताणे, शरद जांभुळकर, श्यामदेव कापटे, संचालीका शांता रासेकर तसेच पिर्ली सरपंचा वर्षाताई तराळे, उपसरपंच नेताजी पिंपळशेंडे, पालीस पाटील विनोद देरकर उपस्थित होते. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर ताजणे यांचे स्वागत सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विष्णुदास मत्ते तसेच उद्घाटक रविंद्र शिंदे यांचे स्वागत उपाध्यक्ष गुलाब मुळे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. संस्थेचे संचालक  शेषराव काकडे, सतिश पिंपळशेंडे, निर्मला पुरी, सुरज येरगुडे, वसंता पिंपळशेंडे, कवीता येरगुडे यांनी इतर मंचावरील पाहुण्याचे स्वागत पुष्पगुछ देत केले.
सर्व प्रथम उपस्थित पाहुण्यानी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. शेतकऱ्यांच्या सेवासाठी तयार झालेल्या वास्तुचे रितसर वास्तुपुजन करीत कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर ताजणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चंद्रपूर सीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
पिर्ली सेवा सहकारी संस्था ही प्रामाणिकपणे कार्य करीत असल्यामुळे आज अविरत 64 वर्षे शेतकऱ्यांना चांगली सेवा प्रदान करीत असून स्वनिधीतुन एवढी मोठी ईमारत उभी करण्यात यश आले असे आपल्या मार्गदर्शनात रविंद्र शिंदे म्हणले आणी विशेष करुन संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. सोबतच भास्कर ताजणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी राजु पारीखी, ईश्वर ठेंगणे, मुर्लीधर टोंगे, संतोष माडेकर, हनुमान टाले युवराज निबुदे आदी उपस्थित होते तसेच कृष्णराव नन्नावरे, शंकर गायकवाड, जनार्धन नन्नावरे, एकनाथ आसुटकर, प्रफुल मेरे तथा शेतकरी बांधव व गावकरी मंडळी उपस्थित होते.
लोकार्पण कार्यक्रमाचे संचालन नंदोरी बु. येथील सरपंच मंगेश भोयर व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिर्ली सेवा सहकारी संस्थेचे सचिव पिदुरकर तथा आभार प्रदर्शन विजय बाराहाते यांनी केले. पिर्ली सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाने लोकार्पण कार्यक्रमास उपिस्थतीबद्दल सर्व मान्यवर, शेतकरी व गावकरी मंडळीचे धन्यवाद व आभार व्यक्त केले.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे.

Comments