अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वर कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वर कारवाई

वरोरा
मौजा सुर्ला कक्ष क्र. 14ब मध्ये आज दिनांक 07/02/2024 रोजी सकाळी 05.30 वाजताचे दरम्यान वनकर्मचारी अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा, व रोजनदारी वनमजुर गस्त करीत असतांना आरोपी भास्कर देवाजी राणे, विकास पांडुरंग काळमेंगे, सुमित बबन काळमेंगे सर्व रा. बांद्रा व रुतिक महादेव गोंडे रा. वनली हे ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CD 7841 व ट्रॅक्टर क्र. MH34 TC 165 ने बामनडोह नाला मधुन अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले. करीता सदर रेती सहित ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्य ताब्यात घेऊन POR No. 09182/229530 दिनांक 07/02/2024 अन्वये वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले.
पुढील चौकशी सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात एस. डी. खोब्रागडे क्षे.स. वरोरा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, व्हि. एम. ढुमणे वनपाल, गजानन एम. बोढे वनरक्षक शेगाव, व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा करीत आहे.

Comments