रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई**भद्रावती तालुक्यातील धानोली परिसरातील घटना*

*रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई*

*भद्रावती तालुक्यातील धानोली परिसरातील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :
          नाल्यातून ट्रॅक्टर मध्ये अवैधपणे रेतीचा भरणा करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाव्दारे कारवाई करण्यात आली असुन दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाव्दारे  दिनांक 9 रोज शुक्रवारला रात्रो मध्यरात्रीनंतर करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
 तालुक्यातील धानोली गाव परिसरातील एका नाल्यात हे दोन्ही ट्रॅक्टर अवैधपणे रेतीचा भरणा करीत होते. दरम्यान भद्रावती महसूल विभागाचे गौण खनिज पथक पेट्रोलिंगवर असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर गौण खनिज पथकाने या दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले व दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले. धानोली येथील बोढे व पिर्ली येथील सातपुते यांच्या मालकीचे सदर ट्रॅक्टर असल्याचे महसूल विभागाद्वारे सांगण्यात आले. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी होत असल्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाचे गौण खनिज पथक दिवस-रात्र या प्रकारावर लक्ष ठेवून कारवाई करीत आहे.सदर कारवाई गौण खनिज पथकाचे तलाठी मस्के व अन्य कर्मचाऱ्यांनी केली. घटनेची पुढील कारवाई महसूल विभागातर्फे सुरू आहे.

Comments