निसर्गाची किमया निराळीच* *वांग्याचे नऊ फूट उंचीचे तर अडीच फुटाचे उंबराचे फळयुक्त झाड*

*निसर्गाची किमया निराळीच*
 *वांग्याचे नऊ फूट उंचीचे  तर अडीच फुटाचे उंबराचे फळयुक्त झाड*

वरोडा : शाम ठेंगडी वर

निसर्गाची किमया निराळी असे म्हणावे अशा अनेक घटना पहावयास व ऐकावयास मिळत असतात. अशाच दोन घटना वरोडा तालुक्यात अनुभवास आल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
       वरोडा तालुक्यातील पहिली घटना कोसरसार येथील तर दुसरी वरोडा शहरातीलच आहे.
   कोसरसार येथील शेतकरी प्रसाद हरिहर तडस यांच्या घरी असलेल्या वांग्याच्या झाडाबाबत आहे. 
     एरवी दोन ते तीन फूट पर्यंत वाढणारे वांग्याचे झाड तडस यांच्या घरचे झाड मात्र आठ ते नऊ फूट उंचीचे झाले आहे.या एकाच वांग्याच्या झाडापासून आठवड्याला तडस यांना पाच ते सहा किलो वांग्याचे उत्पन्न मिळत आहे. ही वांगी प्रसाद तडस गावकऱ्यांना वाटून देतात हे विशेष.
    प्रसाद तडस यांनी हे वांग्याचे झाड दोन वर्षांपूर्वी घराच्या परिसरात लावले होते.  तेव्हापासून या झाडाला ते नियमितपणे खतपाणी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
  येथील आनंदवन चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय पोळ यांनी काही वर्षांपूर्वी कुंडीत एक उंबराचे झाड लावले होते. आता ते झाड दोन ते अडीच फुटाच्या उंचीचे झाले असून त्या झाडाला उंबर लागले आहेत. एवढ्याशा झाडाला उंबर लागणे हे एक आश्चर्य असल्याचे बोलल्या जात आहे.
 कोसरसार येथील नऊ फुटाचे वांग्याचे व डॉक्टर पोळ यांचे कडील अडीच फुटाचे उंबराच्या झाडाला फळे लागणे ही एक नैसर्गिक किमया असल्याचे या परिसरात बोलले जाते आहे.


Comments