रेती साठ्यावर एसडीपीओ चा छापा**रेती साठा महसूल विभागाच्या देखरेखीत*पोलिसांकडून अधिकृत माहिती न मिळाल्याने रेतीसाठी नेमका कोणाचा?

* रेती साठ्यावर एसडीपीओ चा छापा*

*रेती साठा महसूल विभागाच्या देखरेखीत*

पोलिसांकडून अधिकृत माहिती न मिळाल्याने रेतीसाठी नेमका कोणाचा?

वरोडा : श्याम ठेंगडी 

      वरोडा शहरालगत असलेल्या पडीत शेतामध्ये  असलेल्या रेतीच्या साठ्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम यांनी छापा टाकून यंत्र व सामुग्रीसह अंदाजे 60 ब्रास रेतीचा साठा जप्त करून पुढील कारवाई साठी महसूल विभागाला सुपूर्द केली. 
      अवैध रेती साठा आणि अवैध रेती वाहतूक तस्करांवर महसूल व पोलीस विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार वरोडा शहरालगत असलेल्या  पेट्रोल पंप च्या पाठीमागच्या बाजूला एक शेत आहे. या  पडीत जागेत मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम यांना मिळाली. माहिती मिळताच साटम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेत या पडीत शेतामध्ये  छापा टाकला. या दरम्यान अंदाजे 50 ते 60ब्रास रेतीचा साठा आढळून आला. या रेतीच्या साठया जवळ जेसीबी क्र. एमएच 29 बीसी 9098 व हायवा क्र. एमएच 34 एबी
2960, एमएच 40 एके 7446 उभी असल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली असून पुढील कारवाई साठी तहसिलदार  यांना अहवाल पाठविण्यात आला आहे . त्याआधारे तहसीलदारांनी पथक तयार करीत पंडित शेतातील रेतीचा साठा, जेसीबी व 2 हायवा ट्रक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती अजून पर्यंत मिळाली नसून वृत्त लिहीपर्यंत मिळू शकला नाही. पोलीस अधीक्षक तपास करीत आहे. महसूल विभागात हि रेती जमा करण्यात आली आहे.