जन्म जन्म का नाता है, गाय हमारी माता है।**अबब, चक्क आवडत्या " गंगा" नाव असलेल्या गायीचा पहिल्या डोहाळेचा कार्यक्रम**शेतकरी कुटुंबाकडून अभूतपूर्व प्रेरणादायी उपक्रम*

*जन्म जन्म का नाता है, गाय हमारी माता है।*
*अबब, चक्क आवडत्या " गंगा" नाव असलेल्या गायीचा पहिल्या डोहाळेचा कार्यक्रम*
*शेतकरी कुटुंबाकडून अभूतपूर्व प्रेरणादायी उपक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती :- 

                    आज एकविसाव्या शतकात प्राणी मात्रावर प्रेम करणं, त्यावर जीव ओवाळून टाकणं, मुक्या प्राण्यावर सर्वस्व अर्पण करणं ह्या गोष्टी आपल्याला समाजात वावरताना क्वचितच बघायला मिळत असतात. आपण सोशल मीडियावर बघत असतो छोट्याशा रिल्स साठी मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतेल असे विडीओ येत असतात. परंतु यासर्व गोष्टीला बगल देत भद्रावती शहरातील प्रशांत देवराव भोंडे व समिक्षा भोंडे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या गंगा गायीच्या पहिल्या बाळंतपणाचा डोहाळे कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करून प्राण्यामात्रांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. या अनोख्या घटनेची शहरात चर्चा असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. 

        भद्रावती शहारातील झिंगुजी वार्ड येथे राहणारे प्रशांत देवराव भोंडे हे शेतकरी असून जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसायही करतात. त्यामुळेच स्वतः जवळ असलेल्या पशुधनाला ते पोटच्या गोळ्या प्रमाणे वागवतात. त्यांची नित्यनेमाने सेवा करतात.